Gold Rate Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? जाणून घ्या आजचे २२ अन् २४ कॅरेटच्या किंमती

Gold and Silver Rates Today: ११ ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. आठवडाभरात सोन्याच्या दरात २,२४० ची वाढ झाली .
Gold and Silver Prices Today
Gold and Silver Prices Todaysaam tv
Published On: 

Gold Price Today: नवरात्रीचा आजचा पहिलाच दिवस आहे. तुम्ही या दिवसांमध्ये सोनं-चांदी खरेदी करत असाल तर तुम्ही आजचे दर जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पितृपक्षात सोनं-चांदीच्या दरात मोठे बदल झाले होते. पण आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर स्थिर आहेत. मात्र आठवड्याभरात यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम २,२४० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याचे दर २,०५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचं लक्ष आता सोनं-चांदीच्या पुढच्या दरबदलाकडे लागलं आहे.

आठवडाभरात सोन्याचे दर किती वाढले?

उपलब्ध दरांनुसार, सलग दोन दिवसांमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात १,८५० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात १,७०० रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी दर स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी, डॉलरमधला बदल आणि इतर आर्थिक घटकांच्या सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो.

Gold and Silver Prices Today
Money Saving Tips : मित्र असो वा नातेवाईक, पैशांच्या बाबतीत या ७ चुका कधीच करू नका

दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरातले सोन्याचे दर

दिलेल्या दरांनुसार, प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत:

मुंबई - २४ कॅरेट १,५१,४२०, २२ कॅरेट १,३८,८००

दिल्ली - २४ कॅरेट १,५१,५७०, २२ कॅरेट १,३८,९५०

कोलकाता - २४ कॅरेट ₹१,५१,४२०, २२ कॅरेट ₹१,३८,८००

चेन्नई - २४ कॅरेट ₹१,५१,४२०, २२ कॅरेट ₹१,३८,८००

बंगळुरू - २४ कॅरेट ₹१,५१,४२०, २२ कॅरेट ₹१,३८,८००

हैदराबाद - २४ कॅरेट ₹१,५१,४२०, २२ कॅरेट ₹१,३८,८००

लखनऊ - २४ कॅरेट ₹१,५१,५७०, २२ कॅरेट ₹१,३८,९५०

Gold and Silver Prices Today
Ladki Bahin Yojana : नवरात्री सुरू झाली, लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर

चांदीचा आठवडाभरातील भाव

१ ऑक्टोबर रोजी चांदीचे दर प्रतिकिलो ५,००० रुपयांनी घसरले होते. त्यानंतर आठ दिवस दर स्थिर राहिले आणि १० ऑक्टोबर रोजी परत ५,००० रुपयांची वाढ झाली. ११ ऑक्टोबर रोजी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये चांदीचा दर प्रतिकिलो २,४०,००० रुपये होता. तर चेन्नईत चांदीचा दर २,४५,००० रुपये होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com