Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे १९१०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Gold Rate Today 19th January 2026: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर आज १ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त झाले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा वाढले

आतापर्यंतचे सोन्याचे सर्वाधिक भाव

सोन्याने पार केला १,४५,००० रुपयांचा टप्पा

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीचे दर वाढले आहेत. रोज सोने-चांदीचे नवीन दर अपडेट होत असतात. सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहेत. अशातच आजदेखील वाढ झाली आहे. सोन्याचे आतापर्यंतचे सर्वाधिक दर वाढले आहे. आज सोन्याचे दर १ लाख ४५ हजार रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

आतापर्यंतचे सोन्याचे सर्वाधिक दर (Gold Rate Hit High Record)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १९१० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४५,६९० रुपये झाले आहे. २२ कॅरेटमागे सोन्याचे दर १,७५० रुपयांनी वाढले असून १,३३,५५० रुपये झाले आहेत. १८ कॅरेटमागे सोन्याचे दर १,४३० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०९,२७० रुपये झाले आहेत.

८ ग्रॅममागे सोनं १५२८ रुपयांनी महागलं असून हे दर १,१६,५५२ रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर ८ ग्रॅममागे १४०० रुपयांनी वाढले आहे. हे दर १,०६,८४० रुपये झाले आहेत.१८ कॅरेट सोन्याचे दर ८ ग्रॅममागे १,१४४ रुपयांनी वाढले असून ८७,४१६ रुपये झाले आहेत.

१० तोळ्यामागे २४ कॅरेट सोन्याचे दर १९,१०० रुपयांनी वाढले आहेत.हे दर १४,५६,९०० रुपये झाले आहेत. २२ कॅरेटचे दर १० तोळ्यामागे १७,५०० रुपयांनी वाढले असून १३,३५,५०० रुपये झाले आहेत. १८ कॅरेट सोन्याचे दर १४,३०० रुपयांनी वाढले असून १०,९२,७०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price Today: सोनं-चांदीच्या दराने गाठला नवा उच्चांक, १ तोळा सोनं दीड लाखांजवळ; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

चांदीही महागली (Silver Rate Hike)

आज चांदीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. चांदीचे दर १०० ग्रॅममागे १००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ३०,५०० रुपये झाले आहेत. १ किलोमागे १०,००० रुपयांची वाढ होऊन हे दर ३,०५,००० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate : चांदी ₹३५००० वाढली, तर सोनं प्रति तोळा ₹३३२० नं महागलं, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com