Sakshi Sunil Jadhav
मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून विवाहित स्त्रीसाठी सौभाग्याचं प्रतीक आहे. मात्र बदलत्या फॅशनसोबत मंगळसूत्रांचे प्रकारही बदलले आहेत. आजकाल महिलांमध्ये गोल्ड आणि डायमंड मंगळसूत्र दोन्ही लोकप्रिय आहेत. पण कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र अधिक सुंदर दिसेल? जाणून घ्या.
पैठणी, कांजीवरम, बनारसीसारख्या पारंपरिक साड्यांवर गोल्ड मंगळसूत्र रेखीव आणि उठावदार दिसतं.
कॉटन, शिफॉन, जॉर्जेटसारख्या साध्या साड्यांवर डायमंड मंगळसूत्र एलिगंट लुक देतं.
जड कामाच्या साड्यांसोबत पारंपरिक गोल्ड मंगळसूत्र सौंदर्यात भर घालतं.
हलकं आणि मिनिमल डायमंड मंगळसूत्र ऑफिस लुकसाठी योग्य ठरतं.
गडद रंगांच्या साड्यांवर गोल्ड उठून दिसतं, तर पेस्टल शेड्सवर डायमंड अधिक शोभून दिसतो.
ब्लाउजवर जड काम असेल तर साधं मंगळसूत्र आणि ब्लाउज साधा असेल तर स्टेटमेंट मंगळसूत्र निवडावं.
लांब गळ्यासाठी लांब मंगळसूत्र, तर छोट्या गळ्यासाठी हलकं आणि नाजूक डिझाईन योग्य ठरतं.