

सोनं-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला
२४ कॅरेट सोनं दीड लाखांजवळ पोहोचलं
२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही वाढले
चांदीच्या दरात प्रतिकिलो ५,००० रुपयांची वाढ झाली
सोनं-चांदी खरेदी करताना आज खिशाला कात्री लागणार
सोनं-चांदीचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी सोनं-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला. आज पुन्हा सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३८० रुपयांनी वाढ झाली. तर १ ग्रॅम चांदीचे दर ५ रुपयांनी वाढले. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी वाढ झाली. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४२,५३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ३,८०० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,२५,३०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३५० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,३०,६५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,५०० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,०६,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २९० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०६,९०० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,९०० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,६९,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.
दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील आज वाढ झाली. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २७५ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरात तब्बल ५,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,७५,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.
मुंबई - १४,२५३ रुपये
पुणे - १४,२५३ रुपये
चेन्नई - १४,३६८ रुपये
दिल्ली - १४,२६८ रुपये
बंगळुरू - १४,२५३ रुपये
मुंबई - २,७५० रुपये
पुणे - २,७५० रुपये
चेन्नई - २,९२० रुपये
दिल्ली - २,७५० रुपये
बंगळुरू - २,७५० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.