ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; दागिने खरेदी करणाऱ्यांना 'गोल्डन' चान्स, काय आहे आजचा ताजा भाव?

gold rate today : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त झाल्याचे समोर आलं आहे. भाव कमी झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांना 'गोल्डन' चान्स आहे.
gold rate
gold rate today Saam tv
Published On
Summary

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोने स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा

ऐन लग्न सराईत सोने स्वस्त झाल्याने खरेदीदारांना मोठी संधी

संजय महाजन, साम टीव्ही

अमेरिका-इराणने युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 2 हजार 800 रूपयांनी तर चांदीचा दरात ही 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईत सोने स्वस्त झाल्याने दागिने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. युद्धविराम असतानाही लेबनॉनवर भीषण हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात जीवितहानी देखील झाली आहे. दुसरीकडे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी देखील बंद केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झाला आहे. यामुळे सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम हा जळगावमधील सराफा बाजारावर होताना दिसत आहे. जळगावात एक तोळे सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 675 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपयांवर पोहोचला आहे. युद्ध थांबण्याचे घोषणा झाल्यास सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

gold rate
Gold Rate: सोनं चमकलं! सोन्याच्या दरात २०८०० रुपयांनी वाढ, सुवर्णनगरीत आजचे दर किती?

गेल्या काही दिवसांपासून चढ उतार होत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावात काल प्रति तोळ्यामागे सोन्याचा दर जीसएटीसह 1 लाख 56 हजार रुपये इतका होती. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार रुपये इतका होता. कालच्या सोन्याच्या दराच्या तुलनेत आजची सोन्याची किंमत कमी झाल्याने गुंतवणूकदारांची खरेदीसाठी लगभग पाहायला मिळू शकते.

gold rate
Gold Rate: युद्धविरामानंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ; सुवर्णनगरीत आजचे दर किती?

तत्पूर्वी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर हा १५१,४८० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १३८,८५० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा दर ११,२६१ रुपयांवर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com