Gold Rate : दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होणार; तज्ज्ञांचा मोठा इशारा

Gold Silver Rate Hike In Future : जेपी मॉर्गनच्या ताज्या अहवालानुसार सोन्याच्या दरातील सध्याची घसरण तात्पुरती असून जागतिक आर्थिक अनिश्चितता, महागाई आणि भू-राजकीय तणावामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचे वाढणार आहेत.
GOLD PRICES MAY HIT RECORD HIGH BY DIWALI; JPMORGAN PREDICTS STRONG RALLY AHEAD
GOLD PRICES MAY HIT RECORD HIGH BY DIWALI; JPMORGAN PREDICTS STRONG RALLY AHEADSaam tv
Published On
Summary
  • दिवाळीपर्यंत सोन्याचे दर वाढणार

  • सध्याची दरातील घसरण तात्पुरती

  • भू-राजकीय तणावामुळे सोन्याची मागणी वाढू शकते

  • तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या बाजारात पुन्हा तेजी दिसणार

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मध्यपूर्वेतील वाढता तणाव, विशेषतः इराण आणि अमेरिकेदरम्यानच्या भू-राजकीय घडामोडींचा परिणाम सोन्या-चांदीवर होत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली तरी, भविष्यात या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था जेपी मॉर्गनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सोन्याच्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. या अहवालानुसार, सध्याची घसरण तात्पुरती असून येत्या काही महिन्यांत सोन्याचे भाव पुन्हा वेगाने वाढू शकतात. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

GOLD PRICES MAY HIT RECORD HIGH BY DIWALI; JPMORGAN PREDICTS STRONG RALLY AHEAD
Monsoon Update : मान्सूनच्या वाटेत नवं संकट! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी व्यापणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

जेपी मॉर्गन कमोडिटीज रिसर्चच्या नव्या विश्लेषणात जागतिक आर्थिक अनिश्चितता, महागाईचा दबाव आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रेग शियर यांनी सांगितले की, सध्या ग्राहक आणि गुंतवणूकदारांचा कल काही प्रमाणात कमी झालेला दिसत असला तरी बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. जागतिक आर्थिक घडामोडी आणि भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास सोन्याच्या खरेदीत पुन्हा वाढ होऊ शकते.

GOLD PRICES MAY HIT RECORD HIGH BY DIWALI; JPMORGAN PREDICTS STRONG RALLY AHEAD
Skin Care : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा

गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे जागतिक स्तरावर मागणी वाढल्यास त्याचा थेट परिणाम दरांवर होऊ शकतो. आगामी सणासुदीच्या काळात भारतासारख्या देशांमध्ये सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने दर आणखी वाढू शकतात. दरम्यान, सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचा काळ महत्त्वाचा मानला जात आहे. जर तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले, तर दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com