Gold Price Today : आज चांदी स्वस्त! सोन्याचे दर वाढले की घसरले? सुवर्णनगरीतील ताजे भाव जाणून घ्या

Jalgaon Gold Rate : जळगाव सराफ बाजारात आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोन्याचे दर स्थिर आहेत. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर तसेच चांदीचा आजचा भाव जाणून घ्या.
Gold Price Today
Gold Price Todaygoogle
Published On

आंतरराष्टीय बाजारातल्या घडामोंडींचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावरही दिसून येतो.अमेरिका-इराण तणाव काहीसा कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी असलेल्या सोनं -चांदीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून, सोन्याचे दरही काही प्रमाणात कमी झाले आहेत.

सध्या जळगाव सराफ बाजाकात २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम भाव हा १,४४,३३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३२,३०० रुपये इतका आहे. चांदीचा दर प्रति किलो २,२४,००० रुपये आहे. व्यापाऱ्यांच्या मते, जागतिक परिस्थितीत पुन्हा तणाव निर्माण झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातंमध्ये वाढ होऊ शकते. पण परिस्थिती स्थिर असेल तर चांदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Gold Price Today
EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

तर Goodreturns नुसार आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १,४४,३३० रुपये आहे. म्हणजेच १ ग्रॅम सोन्याचा भाव १४,४३३ रुपये इतका आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर १,१५,४६४ रुपये असून १०० ग्रॅम सोन्यासाठी १४,४३,३०० रुपये मोजावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३२,३०० रुपये आहे. १ ग्रॅमसाठी १३,२३० रुपये, तर ८ ग्रॅमसाठी १,०५,८४० रुपये इतका भाव आहे. १०० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १३,२३,००० रुपये नोंदवण्यात आला आहे.

१८ कॅरेट सोन्याचाही दर स्थिकर आहे. तर प्रति १० ग्रॅम १,०८,२५० रुपये आहे. १ ग्रॅमचा दर १०,८२५ रुपये आहे. तर ८ ग्रॅमचा दर ८६,६०० रुपये आहे. १०० ग्रॅम १८ कॅरेट सोन्यासाठी १०,८२,५०० रुपये मोजावे लागतील.

चांदीच्या किंमतीत मात्र मोठी घसरण झालेली आहे. आज चांदीचा भाव प्रति किलो २,२४,०० रुपये आहे. काही दिवसांआधी चांदीचा दर २.२८ लाखांच्या वर होता. अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव कमी झाल्यावर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाली आणि त्याचा परिणाम चांदींच्या किंमतीवर झाला आहे.

Gold Price Today
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? वाचा कॅलक्युलेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com