Gold Price Today: अक्षय्य तृतीयेआधीच सोन्याच्या किंमतीत घसरण; वाचा आजचे दर

Gold Price Fall Today: सोन्याच्या किंमतीत गेल्या चार दिवसांपासून घसरण होत आहे. आजदेखील सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहे. अक्षय तृतीयेआधी सोनं स्वस्त झालं आहे.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On

सध्या लगीनसराईचे दिवस सुरु आहेत. त्यात चार दिवसांवर अक्षय्य तृतीयादेखील आहे. अक्षय्य तृतीयेला अनेकजण सोने खरेदी करतात. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे भाव चेक करुन जा. गेल्या २-४ दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. आजदेखील सोन्याचे भाव घसरले आहेत. सोन्याचे भाव ३० रुपयांनी घसरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सलग २ हजारांपेक्षा जास्त रक्कमेने सोन्याचे भाव घसरत आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव.

Gold Price Today
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

सोन्याचे दर प्रति तोळा (Gold Price Today)

गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ९८,२१० रुपये आहे. आज सोन्याच्या भावात फक्त ३० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७८,५८६ रुपये आहे. आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ९०,०२० रुपये आहे. यामध्येही ३० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,०१६ रुपये आहे.१८ ग्रॅम सोने प्रति तोळा ७३,६६० रुपये आहे. या किंमतीत २० रुपयांची घसरण झाली आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,९२८ रुपये आहे.

चांदीच्या किंमतीत गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. ८ ग्रॅम चांदीची किंमत ८०७ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत १००९ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत १०,०९० रुपये आहे.

Gold Price Today
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पेन्शन ७५०० रुपये होणार?

सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची की तोट्याची?

तज्ज्ञांच्या मतानुसार, सोन्यात केलेली गुंतवणूक ही फायदेशीर आहे. सोन्याचे भाव नेहमी वाढत जाणार आहेत. सध्या सोन्याचे भाव वाढलेले आहेत. यापुढेही भाव थोड्या-फार प्रमाणात कमी जास्त होतील. सोनं हे तुम्हाला बँकेच्या एफडीपेक्षा थोडं तरी जास्त परतावा देईल.

Gold Price Today
Gold-Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण; पाहा देशातील प्रमुख शहरांमध्ये काय आहे दर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com