Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

Gold Price Update: गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. २४ कॅरेट सोनं ३५०० आणि २२ कॅरेट सोनं ३,२०० ने स्वस्त झालं.
Gold Price Today
Gold Price Dropmeta ai
Published On: 

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या महिनाअखेरीस होणाऱ्या बैठकीआधी मौल्यवान धातूंवर दबाव कायम आहे. रविवारी सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मात्र, गेल्या आठवड्याच्या विचार केला तर २४ कॅरेट सोन्याच्या दर प्रति १० ग्रॅम तब्बल ३,५०० ने, तर २२ कॅरेट सोनं ३,२०० ने स्वत झालं आहे.

मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा दर किती?

आज देशातल्या प्रमुख शहरांमध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहेत:

दिल्ली: १८ कॅरेट ₹१,१२,०४०, २२ कॅरेट ₹१,३६,९०० आणि २४ कॅरेट ₹१,४९,३३०

मुंबई: १८ कॅरेट ₹१,११,८९०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०

कोलकाता: १८ कॅरेट ₹१,११,८९०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०

चेन्नई: १८ कॅरेट ₹१,१२,३५०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०

बेंगळुरू: १८ कॅरेट ₹१,११,८९०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०

Gold Price Today
UPI वरून पेन्शन खातं उघडता येणार; BHIM अॅपवर काही मिनिटांत रजिस्ट्रेशन, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

चांदीचा भाव

चांदीच्या दरातही सलग तिसऱ्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. १ ऑक्टोबर रोजी १ किलो चांदीच्या दरात ५,००० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर दर स्थिर आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात एक किलो चांदीचा भाव २,३५,००० आहे. तर चेन्नईमध्ये चांदी २,४५,००० प्रति किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे या प्रमुख शहरांमध्ये चेन्नईत चांदी सर्वाधिक महाग आहे.

Gold Price Today
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधी होणार चांदी! DA 60% वरून 64% होण्याची शक्यता, पगारात किती वाढ होणार?

फेडच्या निर्णयाकडे बाजाराचं लक्ष

आता सोनं-चांदीच्या बाजाराचं लक्ष अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या महिनाअखेरीस होणाऱ्या बैठकीकडे लागलं आहे. महागाईचा ताजा डेटा अपेक्षेपेक्षा कमी आल्याने व्याजदर वाढीची शक्यता कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com