UPI वरून पेन्शन खातं उघडता येणार; BHIM अॅपवर काही मिनिटांत रजिस्ट्रेशन, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Open NPS Account Through UPI: BHIM UPI वरून NPS Tatkal सुविधेच्या मदतीने काही मिनिटांत NPS खातं उघडता येणार आहे. KYC, नॉमिनी आणि सुरुवातीचे योगदान UPI द्वारे पूर्ण करून PRAN मिळवा.
Now Open NPS Account via UPI
Now Open NPS Account via UPImeta ai
Published On: 

प्रत्येक कामगार त्याच्या पगारातला काही भाग हा रिटायरमेंटनंतर वापरण्यासाठी ठेवत असतो. आपण त्याला पेन्शन असं म्हणतो. त्यासाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS हा बेस्ट ऑप्शन मानला जातो. आता NPS खातं उघडण्याची प्रोसेस आणखी सोपी झाली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने ‘NPS Tatkal’ ही सुविधा सुरू केलेली आहे. त्यामुळे UPI च्या माध्यमातून नवीन NPS खातं उघडणं आणि सुरुवातीचे योगदान जमा करणे शक्य होणार आहे.

सध्या कोणत्या अॅपवर सुविधा मिळतेय?

तुम्ही BHIM UPI या अॅपवर NPS Tatkal ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात इतर UPI अॅप्सवरही ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सुविधेशी संध्या SBI, HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank आणि IDFC First Bank हे पाच बँकिंग भागीदार जोडलेले आहे.

Now Open NPS Account via UPI
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधी होणार चांदी! DA 60% वरून 64% होण्याची शक्यता, पगारात किती वाढ होणार?

विशेष म्हणजे, तुमच्या UPI शी लिंक असलेल्या बँक खात्यात आधीच उपलब्ध असलेल्या KYC माहितीचा वापर या प्रोसेससाठी केला जातो. त्यामुळे स्वतंत्रपणे कागदपत्रं अपलोड करण्याची गरज लागत नाही.

Now Open NPS Account via UPI
Government Pension Yojana: छोट्या व्यापाऱ्यांसाठी केंद्राची पेन्शन योजना; वयाच्या 60 नंतर मिळणार दरमहा ₹3,000 पेन्शन

BHIM UPI वरून NPS खाते उघडण्याची स्टेप बाय स्टेप्स

सर्वप्रथम मोबाइलमध्ये BHIM UPI अॅप उघडा. त्यानंतर Financial Services किंवा Investment विभागात जा. तिथे NPS Tatkal हा पर्याय निवडा. UPI शी लिंक असलेलं तुमचं बँक खातं निवडा. बँकेकडून उपलब्ध KYC माहितीची पडताळणी केली जाईल.

त्यानंतर PAN आणि ई-मेलची माहिती द्या. नॉमिनीचे नाव, नाते आणि वयाची माहिती भरा. तुमच्या गुंतवणुकीसाठी Active किंवा Auto Choice ऑप्शन निवडा. NPS खात्यात जमा करायची सुरुवातीची रक्कम भरा. त्यानंतर UPI PIN टाकून पेमेंट पूर्ण करा.

पेमेंट यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर Registration Successful असा मेसेज दिसेल. त्यानंतर काही वेळात तुमचा PRAN (Permanent Retirement Account Number) जनरेट होईल. हा नंबर तुमच्या मोबाइल क्रमांक आणि ई-मेलवर पाठवला जाईल.

कागदपत्रांची झंझट कमी

NPS Tatkal सुविधेमुळे खातं उघडण्याची प्रोसेस फास्ट आणि डिजिटल झाली आहे. बँकेकडे उपलब्ध KYC माहितीचा वापर होत असल्यामुळे पारंपरिक पद्धतीतली कागदपत्रे आणि दीर्घ नोंदणी प्रोसेसची गरज कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com