Gold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याचे दर इतक्या रुपयांनी महागले; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

Gold Silver Rate News Update : आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर जाणून घ्या. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹१,५१,४२० वर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही ५ हजारांची वाढ.
Gold silver rate today
Gold silver rate todayAI Image
Published On: 

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काल सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांच्या खिशाला आता अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या दरातही आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

सोने-चांदी महागली

आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. १ तोळा म्हणजेच १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख ५१ हजार ४२० रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा ७१० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १० तोळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता ७ हजार १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. सणासुदीच्या काळात सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. दसरा, दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक सोन्याचे दागिने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, सोन्याच्या किमतीत सातत्याने होणारे चढ-उतार ग्राहकांचे आर्थिक नियोजन बिघडवू शकतात. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या किमतीत तब्बल ५ हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Gold silver rate today
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,१४२

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२१,१३६

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,५१,४२०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,१४,२००

Gold silver rate today
Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,८८०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,११,०४०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३८,८००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,८८,०००

Gold silver rate today
Heart Care : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय आहे फरक? वेळीच घ्या जाणून

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,३५७

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९०,८५६

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१३,५७०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,३५,७००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com