Heart Care : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय आहे फरक? वेळीच घ्या जाणून

Alisha Khedekar

तुमच्या छातीत दुखतंय?

तुमच्या छातीत तीव्र वेदना होत असतील आणि तुम्हाला कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक आल्याचा संशय येत असेल तर त्यातील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे प्राथमिक उपचार करणे देखील गरजेचे आहेत.

Heart Attack vs Cardiac Arrest Symptoms | Google

नेमका फरक काय?

हार्ट अटॅक येण्यापूर्वी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा येऊन छातीत तीव्र वेदना होतात. आणि कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हृदयाची पंपिंग क्रिया अचानक थांबते.

Heart Attack vs Cardiac Arrest Symptoms | Google

लक्षणे कोणती ?

हार्ट अटॅकमध्ये छातीत दुखणे, घाम आणि वारंवार धाप लागणे जाणवू शकते. कार्डियाक अरेस्टमध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध पडू शकतो आणि त्याला श्वास घेणं कठीण होतं.

Heart Attack vs Cardiac Arrest Symptoms | Google

उपचार काय?

हार्ट अटॅकमध्ये तातडीने रुग्णालयीन उपचार आवश्यक असतात. कार्डियाक अरेस्टमध्ये त्वरित CPR आणि उपलब्ध असल्यास AED वापरणे जीव वाचवू शकते.

Heart Attack vs Cardiac Arrest Symptoms | Google

किती गंभीर?

दोन्ही स्थिती जीवघेण्या ठरू शकतात. कार्डियाक अरेस्टमध्ये काही मिनिटांत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Heart Attack vs Cardiac Arrest Symptoms | Google

काय करावे?

छातीत दुखणे किंवा अचानक बेशुद्ध पडणे याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित ११२ वर संपर्क साधा आणि आपत्कालीन मदत घ्या.

Heart Attack vs Cardiac Arrest Symptoms | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Heart Attack vs Cardiac Arrest Symptoms | Google

NEXT : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

Tea Drinking Habits Tips | Google
येथे क्लिक करा