Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Gold Buying on Dhanteras Diwali 2025: दिवाळीला सोने खरेदीत विक्रमी वाढ झाली आहे. काल एकाच दिवशी १ लाख कोटींची खरेदी करण्यात आली आहे.
Gold Buying
Gold BuyingSaam tv
Published On

सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. सोन्याच्या दरात मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षी सोन्याचे दर ६०,००० रुपयांनी वाढले आहेत. तरीही काल धनत्रयोदशीच्या सोने-चांदीच्या खरेदीत विक्रमी वाढ झाली आहे.

काल धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल १ लाख कोटींची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढले आहेत तरीही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.

Gold Buying
Diwali 2025: दिवाळीतील ४ शुभ मुहूर्त अजिबात चुकवू नका, अन्यथा...; पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली महत्वाची माहिती

काल दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर आता लक्ष्मी पूजनलादेखील या खरेदीत वाढ होऊ शकते.लक्ष्मी पूजनच्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे. किंमती जरी वाढल्या तरीही ग्राहकांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये.

Gold Buying
Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

सोन्याचे दर (Gold Rate Today)

सोन्याचे दर सध्या प्रति तोळ्यामागे १,३०,८६० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,०४,६८८ रुपये आहे तर १० तोळे सोन्याचे दर १३,०८,६०० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१९,९५० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे तुम्हाला ९५,९६० रुपये मोजावे लागणार आहे. तर १० तोळ्याचे दर ११,९९,५०० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९८,१४० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ७८,५१२ रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ९,८१,४०० रुपये आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

चांदीच्या दरातदेखील प्रचंड वाढ होत आहे. चांदीचे दर १०० ग्रॅममागे १७,२०० रुपये आहे. प्रति किलो चांदीची किंमत १,७२,००० रुपये आहे.

Gold Buying
Gold Price Today: दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याने भाव खाल्ला, १० तोळ्याच्या दरात ३३३०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com