Gas Cylinder Price : विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; फक्त 500 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर

Gas Cylinder in five hundred Rs : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय.
Gas Cylinder in five hundred rs
Gas Cylinder in five hundred rsSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील 4 महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या चारही राज्यातील निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस पाडला जातोय.

Gas Cylinder in five hundred rs
Weather Update : महाराष्ट्रासह अर्ध्या भारतात आज मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अलर्ट, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सोमवारी 'हर घर हर गृहिणी योजना' पोर्टल लाँच केले आहे.

याअंतर्गत राज्यातील अंत्योदय कुटुंबांना फक्त 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. अहवालानुसार, या योजनेंतर्गत हरियाणातील सुमारे 50 लाख बीपीएल कुटुंबांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत.

सध्या हरियाणात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास 950 रुपये इतकी आहे. यातील वरील रक्कम सबसिडी म्हणून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी हरियाणा सरकार गृहिणींना लाभ देण्यासाठी दरवर्षी 1500 कोटी रुपये खर्च करणार आहे.

हरियाणा विधानसभेत सध्या भाजपचे सरकार असून नायब सिंग हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रविवारी त्यांनी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत नोंदणीकृत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला.

हर घर हर गृहिणी योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना फक्त 500 रुपये प्रति सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जे कुटुंब या योजनेस पात्र असतील त्यांना वर्षाला 12 सिलिंडर दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री नायब सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. यामुळे महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Gas Cylinder in five hundred rs
Crime News : मुलीला पळवून नेल्याने बाप संतापला, तरुणाच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओही काढले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com