

14 जुलै 2026 रोजी देशभरात पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल कंपन्या आणि नैसर्गिक वायू वितरण करणाऱ्या कंपन्यांनी त्याचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये आजच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, मिडम ईस्टमध्ये वाढत्या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारावर दिसून येतोय. पुरवठा विस्कळीत होण्याची भीती वाढल्याने क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील परिस्थितीबाबत वेगवेगळे संकेत मिळत असल्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यातच इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यांच्या वृत्तांमुळे भूराजकीय तणाव आणखी वाढला असून त्याचा परिणाम इंधन बाजारावर होताना दिसतेय.
नवी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.12 रुपये, तर डिझेलचा दर 95.20 रुपये आहे.
कोलकात्यात पेट्रोल 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबईत पेट्रोलसाठी 111.21 रुपये, तर डिझेलसाठी 97.83 रुपये मोजावे लागतील.
नोएडामध्ये पेट्रोलचा दर 101.96 रुपये आणि डिझेलचा दर 95.44 रुपये आहे.
गुरुग्राममध्ये पेट्रोल 102.97 रुपये, तर डिझेल 95.64 रुपये प्रतिलिटर आहे.
बंगळुरूमध्ये पेट्रोल 111.68 रुपये आणि डिझेल 99.56 रुपये प्रतिलिटर दराने मिळतंय.
14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले तरी विमानांसाठी वापरलं जाणारे एव्हिएशन टर्बाइन फ्युएल आणि 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात दिलासा मिळाला आहे. सुमारे चार महिन्यांनंतर प्रथमच तेल कंपन्यांनी ATF च्या दरात प्रति लिटर सुमारे 5 रुपयांची कपात केलीये. तसेच 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत 183.50 रुपयांनी कमी करण्यात आलीये.
नवी दिल्ली- ₹83.09
मुंबई- ₹86.00
अहमदाबाद- ₹82.25
गुरुग्राम- ₹91.70
नोएडा- ₹91.70
बेंगळुरू- ₹90.00
जयपूर- ₹90.91
चेन्नई- ₹91.50
पुणे- ₹92.50
कोलकाता- ₹93.50
लखनऊ- ₹95.75
हैदराबाद- ₹97.00
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.