Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

Insurance On Debit Card : अनेक बँका डेबिट कार्ड वापरकर्त्यांना मोफत जीवन विमा सुविधा देतात. हे कार्डधारकाला कोणतीही अनुचित घटना किंवा फसवणूक झाल्यास सुरक्षा दिली जाते. क्लमे करण्यासंदर्भात बँकांचे नियम वेगळे आहेत.
Insurance: क्या बात क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या
Insurance On Debit Card
Published On

एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. आजकाल बहुतेक लोकांकडे एक पेक्षा जास्त बँकांचे डेबिट कार्डे असतात. जर तुमच्याकडेही डेबिट कार्ड आहे, तर तुम्हाला त्यावरील सुविधांचीही माहिती असायला हवी. बँक डेबिट कार्ड वापरकर्त्यांना मोफत जीवन विमा सुविधा मिळत असते. यामुळे कार्डधारकाला कोणतीही अप्रिय घटना किंवा फसवणूक झाल्यास त्यांना आर्थिक संरक्षण मिळत असते.

Insurance: क्या बात क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या
SBI Bank : SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँकेने व्याजदरात केली कपात; होम लोन झाले स्वस्त

डेबिट कार्ड वापरकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना विम्याचा क्लेम करण्याचा अधिकार अनेक बँका देतात. वेगवेगळ्या बँका त्यांच्या आवडीनुसार डेबिट कार्डवर विमा देतात. रस्ता अपघातात मृत्यू झाल्यास काही बँका कार्डधारकाच्या कुटुंबाला 4 ते 10 लाख रुपयांचे कव्हरेज देतात. तर अनेक बँकांमध्ये 3 कोटी रुपयांपर्यंतचा जीवन विमा उपलब्ध आहे. जीवन विमा क्लेमबाबत सर्व बँकांच्या वेगवेगळ्या अटी आहेत. त्यामुळे डेबिट कार्ड घेताना या गोष्टींचे तपशील तुमच्या बँकेकडे काळजीपूर्वक तपासून घ्या.

कोणते बँक कार्ड सर्वाधिक विमा देते?

जर तुम्ही SBI डेबिट कार्ड देखील वापरत असाल तर बँक त्यांच्या वेगवेगळ्या कार्ड श्रेणीनुसार, गोल्ड, प्रीमियम इत्यादींवर वेगवेगळे कव्हरेज देत असते. जर कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला बँकेकडून 4 ते 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देत असते. ICICI बँक 50 हजार ते 30 लाख रुपयांपर्यंतचे विमा क्लेम करता येतात.

तसेच एचडीएफसी बँकेच्या वेगवेगळ्या कार्डांवर 5 लाख ते 3 कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकते. कोटक महिंद्रा बँक 50 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देत असते. जर हे दावे घेण्यासाठी बँकांनी कालमर्यादा निश्चित केली आहे, त्यामुळे दाव्याशी संबंधित अटींबद्दल जागरूक राहिले पाहिजे.

Insurance: क्या बात क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या
Cash Withdrawal: आता कार्डची झंझट संपली! आता आधार कार्डनेही काढा पैसे, ही सोपी स्टेप करा फॉलो

क्लेमसाठी आवश्यक गोष्टी

डेबिट कार्डवर मिळणाऱ्या विम्याचा क्लेम करताना बँकेच्या शाखेत संपर्क करणं आवश्यक असतं. तेथे कार्डसंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या. बँकेच्या अटी शर्तीनुसार अर्ज करा. जर कार्डधारकाने नॉमिनी केले असेल तर तो दाव्यासाठी पहिला दावेदार असेल. याशिवाय क्लेम घेण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. वैयक्तिक अपघात विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र आणि केवायसी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com