मुंबई : (Fortune 100 Powerful people list) फॉर्च्युनची यंदाची म्हणजेच 2024 सालची सर्वाधिक शक्तीशाली लोकांची यादी नुकतीच जाहिर झाली आहे. व्यवसाय क्षेत्रातील 100 सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांच्या रूपाने एकमेव भारतीयाचा समावेश आहे, ते 12 व्या क्रमांकावर आहे. यासोबतच भारतीय वंशाच्या सहा व्यक्तींचाही या यादीत समावेश आहे. या यादीत 30 ते 90 वयोगटातील 40 उद्योगपतींचा समावेश आहे. या व्यक्ती मोठ्या व्यवसायांचे संस्थापक, मुख्य अधिकारी आणि सह संस्थापक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्ससह अनेक कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 319 अब्ज डॉलर्स आहे. नुकतेच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जे अमेरिकेत पुन्हा सत्तेवर आले आहेत, त्यांनी त्यांच्याकडे DOGE ची कमानही सोपवली आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बाराव्या स्थानावर
या यादीत, पाचपैकी चार भारतीय वंशाचे सीईओ हे टेक कंपनीचे सीईओ आहेत, तर एक मेकअप ब्रँडशी संबंधीत आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स समुहाचे मालक असलेले मुकेश अंबानी हे बाराव्या स्थानावर आहेत. त्यांनी दळणवळण आणि ऊर्जा क्षेत्रातील आपली भागीदारी मजबूत केली आहे. याशिवाय रिलायन्सने दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. या यादीत भारतीय वंशाचे सत्या नाडेला तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यवसाय क्षेत्रातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यांचे टॉप 10 मध्ये असणे हे जगावर एक उद्योग म्हणून तंत्रज्ञान आणि AI चा प्रभाव दर्शवते.
सीईओ तरंग अमीन या यादीत 94 व्या स्थानावर
त्याच वेळी, पहिल्या 50 मध्ये भारतीय वंशाची दुसरी व्यक्ती नाही. Adobe CEO शंतनू नारायण 52 व्या क्रमांकावर आहेत, सॉफ्टवेअर उद्योगावर, विशेषत: AI टूल्सवर त्यांचा प्रभाव दिसून येतो. YouTube चे कार्यकारी अधिकारी नेल मोहन 69 व्या क्रमांकावर आहेत, जे YouTube चा उद्योग भरभराटीला येत असल्याचे दर्शविते. व्हेंचर कॅपिटलिस्ट विनोद खोसला यांनी 74 व्या क्रमांकावर येऊन व्यवसाय जगतात आपला ठसा उमटवला आहे. मेकअप ब्रँड आइज लिप्स फेस (ELF) चे सीईओ तरंग अमीन या यादीत 94 व्या स्थानावर आहेत.
Edited By- नितीश गाडगे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.