Facebook: फेसबुकवरील तुमचे फोटो कुणीतरी चोरतंय? तुमच्या डेटाचा होतोय गैरवापर?

Facebook Account: फेसबुक अकाऊंट असणाऱ्यांसाठी एक मेसेज व्हायरल होत होता. फेसबुकवरील तुमचे फोटो कुणीतरी चोरतोय असा हा मेसेज होता. या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे घ्या जाणून...
Facebook: फेसबुकवरील तुमचे फोटो कुणीतरी चोरतंय? तुमच्या डेटाचा होतोय गैरवापर?
Facebook saam tv
Published On

संदीप चव्हाण, साम टीव्ही

तुमचं फेसबुक अकाऊंट असेल तर तुमचे फोटो, व्हिडिओ कुणीतरी चोरतंय... होय, तुमचे फोटो फेसबुक वापरत असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच तुमच्या डेटाची चोरी होतेय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

तुम्ही फेसबुक वापरत असाल तर सावधगिरी बाळगा...कारण, तुमचे फोटो, व्हिडिओचा वापर फेसबुक करत असल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे काहीजण फेसबुकवरच पोस्ट करून माझे फोटो, व्हिडिओचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा देतायत...पण, खरंच फेसबुक तुमचा फोटो, डाटाचा वापर करतंय का...? देशभरात फेसबुकचे कोट्यवधी युजर्स आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Facebook: फेसबुकवरील तुमचे फोटो कुणीतरी चोरतंय? तुमच्या डेटाचा होतोय गैरवापर?
Facebook Instagram: फेसबूक-इन्स्टाग्राम ठप्प होण्याचं नेमकं कारण काय? कंपनीने सविस्तर सांगितलं

'माझे वैयक्तिक फोटो आणि माहिती वापरासाठी फेसबुकला कोणतीही परवानगी देत नाही. गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतो.' हा मेसेज सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे अनेकजण हाच मेसेज पोस्ट करतायत. पण, खरंच फेसबुक या मेसेजने युजर्सचं म्हणणं ऐकतं का...? हा मेसेज केल्यानंतर फेसबुक तुमच्या फोटोचा वापर कऱणं थांबवतं का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत कारण, बरेच जण आपला फोटो, कुटुंबीयांचे फोटो, घराचे फोटो शेअर करत असतात...त्यामुळे तुमच्या फोटोचा गैरवापर होत असेल असा दावा केल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमने तज्ज्ञांकडून याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Facebook: फेसबुकवरील तुमचे फोटो कुणीतरी चोरतंय? तुमच्या डेटाचा होतोय गैरवापर?
Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा शुभेच्छा, WhatsApp, Facebook वर शेअर करा शुभेच्छा मेसेज

साम इन्व्हिस्टिगेशननुसार, फेसबुक अकाऊंट तयार करतो, तेव्हा तो अटीशर्ती मान्य करतो.फेसबुक कोणता डेटा गोळा करेल, कसा वापरेल, याची माहिती दिलेली असते.फेसबुकवरील सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी कंट्रोल्स वापरणे. कुठलीही 'कॉपी-पेस्ट पोस्ट' यात बदल करू शकत नाही.फेसबुक फक्त नाव, जन्मतारीख, ग्रुप्स, आणि डिव्हाइसवरून अपलोड केलेला कॉन्टॅक्ट डेटा गोळा करते...फेसबुकवर केलेल्या पोस्ट्स हॅकर्ससाठी रेकीसारख्या असतात. त्यामुळे प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जाऊन पोस्ट, फोटो आणि प्रोफाइल कोण पाहू शकतो ते ठरवा. Off-Facebook Activity बंद करा. फेसबुकद्वारे वापरकर्त्यांचे फोटो आणि इतर वैयक्तिक माहिती वापरत नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय.

Facebook: फेसबुकवरील तुमचे फोटो कुणीतरी चोरतंय? तुमच्या डेटाचा होतोय गैरवापर?
Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com