विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेत्यानं सोडली साथ; फेसबुक पोस्ट करत सांगितलं कारण

Dr. Abhay Patil Resigns from Congress: अकोला काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याने डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
Dr. Abhay Patil Resigns from Congress
Dr. Abhay Patil Resigns from CongressSaam Tv News
Published On
Summary
  • काँग्रेस नेते डॉ. अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

  • अकोला जिल्हा कार्यकारिणीत डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

  • त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून राजीनाम्याची घोषणा केली.

  • २०२४ लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते.

अक्षय गवळी, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच आकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा झाली, मात्र या प्रक्रियेत आपल्याला विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पाटील यांनी काँग्रेसचा 'हात' सोडण्याचा निर्णय घेतला.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावरून डॉ. अभय पाटील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना ४,१६,४०४ मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांचा पराभव झाला होता.

Dr. Abhay Patil Resigns from Congress
जागेचा वाद टोकाला! महिलेच्या झिंज्या धरत तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; घटनेचा VIDEO व्हायरल

डॉ. अभय पाटील कोण आहेत?

डॉ. अभय पाटील यांचा जन्म २० जानेवारी १९६५ रोजी झाला.

शैक्षणिक पात्रता: MBBS, FCPS (ऑर्थोपेडीक सर्जन).

डॉ. अभय पाटील हे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. यापूर्वी ते शासकीय सेवेतही कार्यकरत होते.

मागील ३२ वर्षांपासून अकोल्यात अर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत.

संघटनात्मक भूमिका:

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस.

अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक.

धार्मिक सहभाग:

कावड यात्रा, गुढीपाडवा उत्सव यांसारख्या उपक्रमात सक्रीय सहभाग.

डॉ. अभय पाटील यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेक गरजू रूग्णांना मदत केली आहे. अनेक गावागावांमध्ये वैद्यकीस शिबिरे घेऊन रूग्णसेवा दिलीय.

डॉ. अभय पाटील यांनी राजकीय संन्यास का घेतला?

काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू आहेत. प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर नव्या प्रदेश कार्यकारिणीची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी उशिरा काँग्रेसने अधिकृतपणे नवी कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही जुन्या पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

यामुळे काँग्रेसच्या अनेक ठिकाणी नाराजीचं वातावरण आहे. विशेषतः अकोल्यामध्ये या निर्णयाचा मोठा परिणाम जाणवला. काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीत डॉ. पाटील यांना प्रतिष्ठेचं सरचिटणीस पद मिळालं होतं. मात्र, नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत त्यांना स्थान न मिळाल्यामुळे, आपण डावलल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी तात्काळ पक्षत्याग करत राजकीय क्षेत्रातून संन्यास घेतल्याची माहिती समोर येत आहे.

Dr. Abhay Patil Resigns from Congress
"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com