Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

Meta Blocks 10 Million Facebook Accounts: मेटाने १ कोटी फेसबुक अकाउंट्सवर मोठी कारवाई केली आहे. ५ लाखांहून अधिक अकाउंट्सवर दंडही ठोठावण्यात आला आहे. पण मेटानं ही कारवाई का केली हे जाणून घेऊ.
Meta Blocks 10 Million Facebook Accounts
Meta blocks over 10 million Facebook accounts in a massive crackdown against fake and spam contentsaam tv
Published On

युट्यूबनंतर आता मेटानेही मोठी कारवाई केली असून जवळपास १ कोटी अकाउंट्स ब्लॉक करण्यात आली आहेत. मेटानं इतक्या मोठ्या फेसबुक अकाउंटवर कंपनीने का करावाई केली, असा प्रश्न केला जात आहे. जे ओरिजनल नसलेले, स्पॅम कंटेंट किंवा इतरांकडून कॉपी केलेले कंटेंट पोस्ट करत होते, त्या अकाउंटवर मेटानं कारवाईचा बडगा उगरलाय. इतकेच नाही तर त्यांच्याकडून दंड देखील वसूल केलाय.

मेटाने फेक इंगेजमेंट, पुनरावृत्ती पोस्ट रिपेटेटिव्ह पोस्ट आणि व्ह्यूज किंवा पैशासाठी सिस्टममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ लाख अकाउंटसवर मेटाने दंड ठोठावलाय. लोक पैसे आणि व्ह्यूजसाठी एआय व्हिडिओ पोस्ट करत आहेत. म्हणूनच यूट्यूबप्रमाणे मेटाने देखील कमी मेहनत असलेल्या कंटेंटविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. ऑरिजनल क्रिएटर्सला श्रेय आणि रिच मिळावी, जे त्याचे हक्कदार आहेत.

यासाठी मेटाने कारवाईचा बडगा उगारलाय. यामुळे डुप्लिकेट व्हिडिओ शोधण्यात येत असून त्यांना काढून टाकण्यासाठी प्रगत शोध साधने वापरली जात आहे. याचा परिणाम वारंवार कंटेंट चोरणाऱ्या अकउंटसच्या रिचवर परिणाम होणार आहे. तसेच त्यांना फेसबुकच्या माध्यामातून कमावण्यात येणाऱ्या पैशांवरही बंदी घातली जाणार आहे.

दरम्यान तुम्ही जर एआय टूल वापरून कटेंट तयार करत असाल तर लक्षात ठेवा मेटा त्यांच्यावरही कारवाई करत आहे. एआय टूल्सवर जास्त अवलंबून राहणाऱ्यांना मेटाकडून इशारा देण्यात आलाय. कंपनीने नावे दिली नाहीत परंतु खराब तयार केलेले कंटेंट, कमी दर्जाचे ऑटो-कॅप्शन आणि दुसऱ्याच्या कटेंटवर वॉटरमार्क करणाऱ्यांना इशारा देण्यात आलाय. युझर्सने पुन्हा पोस्ट केलेला व्हिडिओ मूळ व्हिडिओशी जोडले जाईल असं फीचर मेटाकडून आणलं जात आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जे लोक इतरांचे कटेंट चोरतात, अशा स्पॅम कंटेंट किंवा इतरांचे काम चोरणाऱ्या क्रिएटर्सची चिंता वाढलीय.

Meta Blocks 10 Million Facebook Accounts
Jio-Airtel-Vi युझर्स ऐकलं का! रिचार्ज प्लॅन महागणार, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना देणार धक्का

दरम्यान हे नवीन नियम हळूहळू लागू केले जातील, जेणेकरून कंटेंट क्रिएटर्सना नवीन नियमांशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळेल, असं मेटाकडून सांगण्यात आले आहे. नवीन नियम लागू करण्यामागील कंपनीचा हेतू स्पष्ट आहे, जर तुम्ही ओरिजनल नसलेली कोणतीही गोष्ट पोस्ट करत असाल तर तुमचेही अकाउंट ब्लॉक होईल. तसेच तुमचा रिच कमी होईल शिवाय रेवेन्यूदेखील गायब होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com