Fact Check: सरकार मुलींना खरंच देणार २ लाख रुपये? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Fact Check Of Viral Message: सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात मुलींना सरकार २ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले आहे.
Fact Check
Fact CheckSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी आणि मुलींसाठी राबवल्या जातात.सध्या सोशल मीडियावर मुलींच्या योजनेबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मुलींना पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा मेसेज खोटा आहे.

Fact Check
Post Office Scheme: सरकारचा मोठा निर्णय! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत आता व्याज मिळणार नाही, तुम्हीही केली होती का गुंतवणूक?

बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मुलींना २ लाख रुपये दिले जाणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज खोटा असल्याचे समोर आले आहे.

PIB म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अनुसार, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मुलींना २ लाख रुपये दिले जाण्याची तयारी केली जात आहे. याबाबत फॉर्मदेखील दिला जात आहे.यात लिहलंय की, प्रधानमंत्री योजना बेटी बचाओ बेटी पढाओअंतर्गत रजिस्ट्रेशन फॉर्म देण्यात आला आहे. यासाठी ८ ते २२ वयोगटातील मुली अर्ज करु शकतात.

त्याचसोबत अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्म तारीख, फोटो, बँक खाते क्रमांक अशी सर्व माहिती मागितली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना २ लाख रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. परंतु हा मेसेज खोटा आहे. असा कोणत्याही फॉर्म न भरण्याचे आवाहन पीआयबीने दिले आहे. (Fact Check About Beti Bachao Beti Padhao Scheme Message)

Fact Check
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

PIB ने २३ नोव्हेंबर रोजी पोस्ट करुन हा फॉर्म खोटा असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फॉर्म चुकीचा आहे. या योजनेअंतर्गत अशी कोणत्याही प्रकारची मदत केली जात नसल्याचे सांगितले आहे. (Fake Viral Message)

Fact Check
Viral Video: सुपरमॉम! इवल्याशा जिवाला जबड्यात घेऊन निघाली कॉलरवाली वाघीण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com