Surabhi Jagdish
भारत सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमने एक पोस्ट शेअर केलीये. यावेळी त्यांनी खातेधारकांना इशारा दिलाय.
सध्या सायबर क्राईमअंतर्गत स्कॅमर्सनी असा मेसेज तयार केला आहे. ज्यामध्ये एसबीआयच्या रिवॉर्ड पॉईंट्सचा उल्लेख करण्यात आला आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या X अकाऊंटवरूनही हा मेसेज फसवा असल्याचं सांगण्यात आलंय.
पीआयबीच्या माहितीनुसार, SBIच्या या फेक मेसेजमध्ये लिंक आणि APK फाईल शेअर करण्यात आलेली आहे. हा एक टेक्स्ट मेसेज असून त्याच्या टायटलमध्ये SBI Reward चा उल्लेख करण्यात आलाय.
काही रुपयांच्या पॉईंटचा उल्लेख असणाऱ्या या मेसेजमध्ये हे पॉईंट रिडीम करता येऊ शकतात असं सांगत अॅप Install करण्यास सांगितलं जातंय.
मेसेजमध्ये असणारी एपीके फाईल स्कॅमर फोनमध्ये इन्स्टॉल करत तुमची सर्व खासगी माहिती मिळवू शकतात. तुमचा OTP आणि बँकेच्या माहितीपासून सर्वकाही या स्कॅमर्सच्या हाती लागू शकते.
या फसव्या मेसेजच्या माध्यमातून फक्त तुमची फसवणूकच नव्हे तर तुमच्या नावे कोणी कर्जही घेऊ शकतं. त्यामुळं कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती तपासून पाहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.