EPFO: घरबसल्या काढा PF चे पैसे! ऑनलाइन क्लेम करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

EPF Withdrawal: EPFO सदस्यांना आता घरबसल्या ऑनलाइन पीएफचे पैसे काढता येतात. UAN, आधार आणि बँक खातं लिंक असेल तर ऑनलाइन क्लेम कसा करायचा याची प्रोसेस वाचा.
PF Withdrawal Online
PF Withdrawal Onlinesaam tv
Published On: 

PF Withdrawal Process: नोकरी करत असताना दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातली काही रक्कम प्रोव्हिडंट फंड (PF) खात्यात जमा केली जाते. कर्मचारी आणि कंपनी दोघांचंही या खात्यात योगदान असतं. ही रक्कम भविष्यातली आर्थिक सुरक्षिततेसाठी जमा केली जाते. पण घर खरेदी, वैद्यकीय उपचार, मुलांचं शिक्षण, लग्न किंवा नोकरी सुटल्यानंतर आर्थक गरज असेल तर कर्मचारी पीएफमधले पैसे काढू शकतात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसते घरबसल्या ऑनलाइन क्लेम करता येतो.

PF Withdrawal Online
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 10 टक्क्यांनी भाव कोसळले; आणखी स्वस्त होणार का?

PF काढण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक?

ऑनलाइन पीएफ क्लेम करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे.

  • तुमचा UAN (Universal Account Number) अॅक्टीव्ह असायला हवा.

  • UAN सोबत आधार कार्ड लिंक असायला हवं.

  • बँक खातं आणि IFSC कोडची माहिती अपडेट असायला हवी.

  • आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर सुरू असायला हवा.

  • पीएफ खात्याचे KYC पूर्ण केलेली पाहिजे.

PF Withdrawal Online
EPFO SWP Plan : EPFO चा मोठा दिलासा! रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार 'पगार'; SWP प्लॅनमुळे PF चे पैसे काढणेही सोपे

घरबसल्या ऑनलाइन PF कसा काढायचा?

पीएफचे पैसे काढण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत मेंबर पोर्टलवर जा.

  • तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.

  • त्यानंतर 'Online Services' या पर्यायावर क्लिक करा.

  • आता 'Claim (Form-31, 19, 10C & 10D)' हा पर्याय निवडा.

  • स्क्रीनवर तुमच्या बँक खात्याचे तपशील दिसतील. ते तपासून व्हेरिफाय करा.

  • 'Proceed for Online Claim' या पर्यायावर क्लिक करा.

  • आता तुम्हाला कोणत्या प्रकारचा क्लेम करायचा आहे, ते निवडा.

  • आवश्यक माहिती भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

  • सर्व माहिती तपासल्यानंतर आधारशी लिंक मोबाइलवर आलेला OTP टाका आणि अर्ज सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.