ऐन लग्नसराईत सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव जवळपास ९.५ टक्क्यांनी घसरला असून, १४ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळे ग्राहकांना आता सोनं आणखी स्वस्त मिळणार का, असा प्रश्न पडला आहे. सोन्याचा भाव हा १२५४० रुपयांनी आठवड्याभरात घसरला आहे.
२४ कॅरेट - १,२५,०८०
२२ कॅरेट - १,१४,६५०
२४ कॅरेट - १,२५,२३०
२२ कॅरेट - १,१४,८००
२४ कॅरेट - १,२५,०८०
२२ कॅरेट - १,१४,६५०
सोन्याच्या किमती घसरण्यामागे पाच प्रमुख कारणं आहेत.
डॉलर मजबूत झाला - अमेरिकन डॉलरची ताकद वाढल्याने इतर देशातल्या गुंतवणूकदारांसाठी सोनं महाग झालं. त्यामुळे मागणीवर परिणाम झाला.
व्याजदर वाढण्याची शक्यता - अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवू शकते, असा बाजाराता अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर पर्यायांकडे वळत आहेत.
फेडचे कठोर संकेत - अमेरिकेतले महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर जास्त ठेवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे.
AI कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण - शेअर बाजारातलं नुकसान भरून काढण्यासाठी काही गुंतवणूकदरांनी सोन्याची विक्री केली. त्यामुळे दर आणखी खाली आले.
महागाईची चिंता - अमेरितल्या महागाईबद्दल अनिश्चितता कायम असल्याने सोन्यातल्या गुंतवणुकीवर परिणाम झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.