EPFO Latest News : EPFO चा मोठा निर्णय! ₹१५,००० ची मर्यादा आता ₹२५,०००? तुमच्या पगारावर काय परिणाम होणार?

Provident Fund : EPFO ने अनिवार्य सदस्यत्वासाठी वेतन मर्यादा ₹१५,००० वरून ₹२५,००० केली आहे. या बदलामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पीएफ पेन्शन आणि विमा लाभ मिळेल.
EPFO Latest News
EPFO Latest Newsmeta ai
Published On: 

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाती बातमी आहे. तुमचा महिन्याचा पगार १५ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान असेल, तर EPFO च्या वेतन मर्यादेतल्या बदलाचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. या बदलामुळे जास्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (PF), पेन्शन आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण पीएफची कपात वाढल्यावर हातात मिळणारा पगार कमी होऊ शकतो.

EPFO ची वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO मधल्या अनिवार्य सदस्यत्वासाठी वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. आता हा बदल १७ सप्टेंबरपासून लागू झाल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे ५१ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी EPFO च्या विभागात येऊ शकतात. पण ही माहिती आणि लागू होण्याची तारीख अधिकृतपणे सरकारने जाहीर केलीये का? हे तपासणं महत्त्वाचं ठरेल.

EPFO Latest News
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी होणार? फिटमेंट फॅक्टर ४ ची चर्चा, पगार किती वाढणार?

२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना काय फायदा?

समजा, तुमची बेसिक सॅलरी (Basic Salary) महिन्याला २० हजार रुपये असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच EPFO अंतर्गत येणाऱ्या कंपनीत नोकरी सुरू करत असाल. तर नवीन मर्यादेनुसार तुम्हाला नियमांनुसार PF सदस्यत्व मिळू शकतं. त्यामुळे रिटायरमेंटसाठी बचत, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजना (EDLI) यांचे लाभ मिळण्याची शक्यता आहे.

EPFO Latest News
Bank Holidays November: नोव्हेंबरमध्ये बँका तब्बल १६ दिवस बंद! दिवाळी, भाऊबीज ते गुरु नानक जयंती, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सुट्टीची यादी

१० हजार रुपये पगार असणाऱ्यांवर काय परिणाम?

महिन्याला १० हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या बदलामुळे विशेष नवीन परिणाम अपेक्षित नाही. ते लागू नियमांनुसार आधीपासूनच अनिवार्य PF कव्हरेजमध्ये येऊ शकतात.

PF कपात वाढल्यावर हातात किती पगार मिळेल?

जर PF योगदानाची गणना वैधानिक वेतन मर्यादेनुसार (Statutory Wage Ceiling / Limit) केली, तर कर्मचाऱ्याचा १२ टक्के हिस्सा १५ हजार रुपयांवर १,८०० रुपये होतो. २५ हजार रुपयांच्या मर्यादेवर तो ३,००० रुपये होऊ शकतो. म्हणजेच दरमहा १,२०० रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे.

१२ वर्षांनंतर मर्यादेत बदल?

१५ हजार रुपयांची वेतन मर्यादा सप्टेंबर २०१४ मध्ये निश्चित करण्यात आली होती. नवीन मर्यादेमुळे अधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा उद्देश आहे. मात्र, प्रत्यक्ष PF कपात ही लागू नियम, पात्रता आणि योगदानासाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या वेतनावर अवलंबून असेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत EPFO माहिती तपासावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com