
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये ठरावीक रक्कम जमा केली जाते. यातील काही रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून तर काही रक्कम कंपनीकडून दिली जाते. दर महिन्याच्या कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीतून १२ टक्के रक्कम जमा केली जाते. यातील काही रक्कम पेन्शनच्या स्वरुपात तुम्हाला दिली जाते. दरम्यान, नोकरी बदलताना तुम्हाला पीएफ अकाउंट ट्रान्सफर करावे लागतात. परंतु जर तुम्ही नोकरी बदलल्यानंतर लगेच पीएफ खात्यातील पैसे काढत असाल तर तुम्हाला चांगलाच फटका बसेल. यामुळे तुमचे नुकसान होणार आहे.
नोकरी बदलताना पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणे गरजेचे असते. परंतु तुम्ही जर पीएफचे पैसे काढत असाल तर तुमचे नुकसान होऊ शकते. सध्या पीएफ अकाउंटवर ८.२५ टक्के व्याजदर मिळते. हे व्याजदर सर्वाधिक आहे. यामुळे तुम्हाला खूप फायदा मिळतो. परंतु जर तुम्ही पैसे काढले तर यावरील व्याजदर तुम्हाला मिळणार नाही.
पीएफ खात्यात दरवर्षी व्याजदर जमा केले जाते. यावर चक्रव्याढ व्याजदेखील लागते. त्यामुळे पैसे डबल होतात. दरम्यान, जर तुम्ही नोकरी बदलली असेल तर चक्रव्याढ व्याज मिळणार नाही. याचाच अर्थ असा की, जर तुम्ही सतत नोकरी बदलली तर तुम्हाला पीएफ खात्यावर मिळणारे चक्रव्याढ व्याज मिळणार नाही. यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे.
जर तुम्ही ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढत असाल तर त्यावरही तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे. त्यामुळे पीएफ अकाउंटमधील गुंतवणूक ही भविष्यासाठी फायदेशीर असते. परंतु जर तुम्ही लवकरात लवकर पीएफचे पैसे काढत असाल तर हे तुमच्यासाठी तोट्याचे ठरेल..
पीएफ अकाउंट ट्रान्सफर करा
तुम्ही नोकरी बदलताना पीएफचे पैसे काढण्यापेक्षा नवीन कंपनीत ट्रान्सफर करा. तुम्ही ऑनलाइन यूएएन पोर्टलद्वारे काही मिनिटांत हे पैसे ट्रान्सफर करु शकतात.
अकाउंटमधील पैसे काढल्यावर मिळत नाही पेन्शन
दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीतून १२ टक्के रक्कम जमा केली जाते. याचसोबत नियोक्त्याकडूनही तेवढीच रक्कम जमा केली जाते. कंपनीच्या फंडमधील ८.३३ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पेन्शन अकाउंटमध्ये जाते. जर उरलेली ३.६७ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. दरम्यान, जर तुम्ही १० वर्षे काम केल्यानंतर नोकरी सोडली तर तुम्हाला पेन्शन मिळवण्यासाठी ईपीएस अकाउंट अॅक्टिव्ह ठेवावे लागणार आहे. जर तुम्ही पीएफमधील पैसे काढले आणि पेन्शन अकाउंटमध्ये पैसे जमा केले तरीही तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. परंतु तुम्ही जर पेन्शनमधीलही सर्व रक्कम काढली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.