EPFO death claim: कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला कसे मिळणार PF आणि विम्याची रक्कम? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

EPFO death benefits: EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला PF, EDLI विमा आणि EPS कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो. मृत्यू प्रमाणपत्र, आवश्यक फॉर्म, कागदपत्रे आणि दावा करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. बँक खाते आणि कर्जाबाबतही महत्त्वाची माहिती येथे वाचा.
EPFO death claim
EPFO death claimsaam tv
Published On

कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं हा सगळ्यांसाठीच मोठा धक्का असतो. या कठीण काळात कुटुंबाला भावनिक त्रासासोबतच पैशांची अडचणही जाणवू शकते. मात्र मृत व्यक्ती ईपीएफओशी (EPFO) जोडलेली असेल तर कुटुंबाला पीएफ, विमा आणि पेन्शनसह काही आर्थिक लाभ मिळू शकतात. हे लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात आणि काय प्रक्रिया करावी लागते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

सर्वात आधी मृत्यू प्रमाणपत्र काढा

व्यक्तीच्या मृत्यूनंतर सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र रुग्णालय, महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काढता येतं. अनेक ठिकाणी यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. पीएफचा दावा, बँक खात्यातील पैसे किंवा इतर आर्थिक बाबींसाठी मृत्यू प्रमाणपत्राची गरज पडू शकते. त्यामुळे या प्रमाणपत्राच्या पुरेशा प्रती काढून त्या सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.

EPFO death claim
EPFO New Rule: ईपीएफओचा नियम बदलला! ₹२५,००० पगार असलेल्यांना किती मिळणार पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण गणित

पीएफ, विमा आणि पेन्शनचा लाभ कसा मिळणार?

ईपीएफओशी जोडलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, पात्र नॉमिनी किंवा कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे आर्थिक लाभ मिळू शकतात.

पीएफची रक्कम -

मृत व्यक्तीच्या पीएफ खात्यात कर्मचारी आणि कंपनीकडून जमा झालेली रक्कम, त्यावरील लागू व्याजासह, पात्र व्यक्तीला मिळू शकते. यासाठी पीएफची रक्कम काढण्यासाठी दावा करावा लागतो. यासाठी फॉर्म 20 वापरला जातो.

ईडीएलआय विमा -

कर्मचाऱ्याचा ईपीएफओशी संबंध असेल, तर कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना म्हणजेच ईडीएलआय (EDLI) अंतर्गत कुटुंबाला विम्याचा लाभ मिळू शकतो. सध्याच्या नियमांनुसार या योजनेत जास्तीत जास्त 7 लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळू शकते. यासाठी फॉर्म 5IF भरून दावा करावा लागतो.

पेन्शन-

कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS अंतर्गत पात्र पती किंवा पत्नीला कौटुंबिक पेन्शन मिळू शकते. तसंच नियमांनुसार पात्र मुलांनाही ठरावीक कालावधीपर्यंत पेन्शनचा लाभ मिळू शकतो. यासाठी साधारणपणे फॉर्म 10D भरून दावा करावा लागतो.

EPFO death claim
EPFO Alert: नोकरी सोडली तरी PF वर मिळणार व्याज? EPFO चा हा नियम नक्की जाणून घ्या

मृत व्यक्तीच्या कर्जाचे काय होते?

मृत व्यक्तीच्या नावावर घराचे कर्ज, गाडीचे कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज असेल, तर कुटुंबाने सर्वात आधी संबंधित बँक किंवा आर्थिक संस्थेशी संपर्क साधावा. कर्ज घेताना काही वेळा त्यासोबत कर्जाचा विमाही घेतलेला असतो.

जर कर्जासोबत असा विमा घेतलेला असेल आणि त्याच्या अटी पूर्ण होत असतील तर विम्याच्या रकमेतून कर्जाची थकबाकी भरली जाऊ शकते. त्यामुळे कर्जाची कागदपत्रं आणि त्यासोबत घेतलेल्या विम्याची माहिती तपासणं महत्त्वाचं आहे.

मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे कसे मिळवायचे?

मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून एटीएमच्या माध्यमातून पैसे काढणं टाळावं. त्याऐवजी मृत्यू प्रमाणपत्र आणि आवश्यक ओळखपत्रं घेऊन थेट बँकेशी संपर्क साधावा. बँक खात्यात नॉमिनीचं नाव असल्यास, बँकेच्या नियमांनुसार खात्यातील रक्कम नॉमिनीच्या खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते.

EPFO death claim
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 20 दिवसांत PF पैसे नाही आले तर काय करायचं? EPFO चा नवा नियम

सर्व दाव्यांसाठी संबंधित संस्थेशी संपर्क करा

मृत व्यक्तीच्या पीएफ, विमा, पेन्शन, बँक खाते किंवा कर्जाशी संबंधित लाभ मिळवण्यासाठी संबंधित संस्था किंवा कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत. योग्य कागदपत्रं आणि योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यास कुटुंबाला पीएफ, विमा, पेन्शन आणि बँकेतील पैसे मिळवणं सोपं होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com