

जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे सदस्य असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भविष्यात पीएफ काढणं, ई - नॉमिनेशन करणं किंवा इतर ऑनलाइन सेवा वापरणं सोपं व्हावं, यासाठी EPFO ने सदस्यांना प्रोफाइलवरचे फोटो अपडेट करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. प्रोफाइल फोटो नसेल तर काही ऑनलाइन प्रोसेस पूर्ण करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
फक्त फोटोच नाही, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांसारख्या माहितीमध्ये अपडेट ठेवणं गरजेचं आहे. यामुळे पीएफ ट्रान्सफर, पैसे काढणे, पेन्शन आणि इतर ऑनलाइन सेवांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळू शकतो.
१. EPFO च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन १२ अंकी UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
२. पुढे होमपेजवर View या ऑप्शनवर क्लिक करून Profile हा पर्याय निवडा.
३. प्रोफाइल पेजवर डाव्या बाजूला दिसणाऱ्या Change Photo या ऑप्शनवर क्लिक करा.
४. मोबाईल किंवा संगणकातून पासपोर्ट साइज डिजिटल फोटो निवडा.
५. आता फोटोचा प्रीव्ह्यू तपासल्यानंतर Upload Photograph वर क्लिक करा आणि OK करून संपूर्ण प्रोसेस पूर्ण करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.