Naresh Goyal News: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणीत वाढ, ईडीने जप्त केली 500हून अधिक कोटींची संपत्ती

Naresh Goyal News: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
jet airways founder naresh goyal Arrested by ed  on canara bank fraud case
jet airways founder naresh goyal Arrested by ed on canara bank fraud case Saam TV
Published On

Naresh Goyal News:

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी नरेश गोयल यांच्यासह पाच जणांवर मोठी कारवाई केली आहे. आता ईडीने नरेश गोयल यांची ५३८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. (Latest Marathi News)

ईडीने ३१ ऑक्टोबर रोजी नरेश गोयल आणि त्यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. कॅनरा बँक घोटाळ्या प्रकरणी नरेश गोयल यांची ईडीने ५३८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याच प्रकरणात ईडीने नरेश गोयल यांना १ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. नरेश गोयल हे सध्या मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

jet airways founder naresh goyal Arrested by ed  on canara bank fraud case
Ken Griffin : बॉस असावा तर असा... स्वखर्चात घडवली कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना Disney World Tour

ईडीने कारवाई करताना स्पष्ट केलं की, नरेश गोयल यांच्याविरोधात पीएमएलए २००० अंतर्गत कारवाई केली आहे. ईडीने या कारवाईत नरेश गोयल यांची ५३८ कोटी रुपयांची तात्पुरती स्वरुपाची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या कंपनी आणि व्यक्तींच्या नावावर १७ बंगले आणि व्यावयायिक गाळे आहेत.

jet airways founder naresh goyal Arrested by ed  on canara bank fraud case
Rules Change In November 2023 : नवा महिना, नवे नियम! पैशांसंबंधित या गोष्टींमध्ये बदल; तुमच्या खिशावर परिणाम होणार?

काय आहे प्रकरण?

कॅनरा बँकेने आरोपात म्हटलं की, ' जेट एअरवेज लिमिटेडला ८४८.८६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होतं. त्यापैकी ५३८.६२ कोटी रुपये थकित आहेत. या कारणावरून कॅनरा बँकेने तक्रार दाखल केली. त्यानंतर बंद पडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

ईडीने नरेश गोयल आणि इतर लोकांच्या विरोधात ईडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याचबरोबर कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर ईडीने नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल, आनंद शेट्टी आणि जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com