बॉस म्हटल्यावर डोळ्यासमोर कडक, शिस्तप्रिय अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. बॉस म्हणजे अशी व्यक्ती जी फक्त टार्गेट आणि काम करायला लावते. परंतु याच बॉसने जर तुम्हाला बाहेरगावी स्वखर्चाने फिरायला नेले तर... आश्चर्य वाटलं असेल ना. परंतु एका बॉसने त्याच्या कर्मचाऱ्यांना मोफत परदेश ट्रीप स्पॉन्सर केली आहे.
Citadel LLC कंपनीचे CEO केन ग्रिफिन यांनी आपल्या कंपनीच्या शेकडो कर्मचाऱ्यांना कुटुंबासह टोकिओ, जपानमध्ये वॉल्ट डिस्ने वर्ल्डचा फिरण्याची संधी दिली आहे. एका रिपोर्टनुसार, ग्रिफिन यांनी कंपनीच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांना ही खास भेट दिली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ग्रिफिन यांनी स्वतः ३०० कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसह तब्बल १२०० लोकांचा खर्च उचलला आहे. या लोकांना टोकियोमध्ये वीकेंडची मज्जा घेण्याची संधी दिली. ही प्रवास तीन दिवसांचा होता.
कंपनीचे प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. ग्रिफिन यांनी स्वतः कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा प्रवास खर्च., तिकीट, हॉटेल आणि जेवणाचा खर्च दिला. या तीन दिवसात कर्मचाऱ्यांनी खूप मजा केली. याचसोबत त्यांनी कर्मचाऱ्यांना खासगी संगीत कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करु दिली. असे त्यांनी सांगितले.
एका अहवालानुसार, ग्रिफिन हे जगातील ३८ वे श्रीमंत व्यक्ती आहेत. एप्रिल २०२३ पर्यंत ग्रिफीन यांची संपत्ती ३५ अब्ज डॉलर एवढी होती. ते नेहमीच कर्मचाऱ्यांना अशा मोठ्या पार्ट्या देत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.