Honda City वर मिळत आहे तब्बल 73,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Honda City वर मिळत आहे तब्बल 73,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
Honda City
Honda CitySaam Tv
Published On

Honda Cars India Offers: जपानी कार निर्माता कंपनी Honda सध्या Amaz, City आणि City e:HEV सह आपल्या सर्व कारवर सूट देत आहे. Honda Amaze वर कंपनी 21,000 रुपयांची रोख सूट देत आहे. त्याच वेळी कंपनी 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज रिप्लेसमेंट ऑफर देत आहे. याशिवाय 12,296 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस. तसेच 5,000 ते 6,000 कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

Honda City
Upcoming Royal Enfield Bullet 350: पुढील महिन्यात लॉन्च होणार नवीन बुलेट 350, जाणून घ्या काय असेल खास...

Honda City वर 73,000 रुपयांची सूट

Honda City बद्दल बोलायचे झाले तर कंपनी या कारवर 73,000 ची सूट देत आहे. सवलतीच्या ऑफरमध्ये, कारला 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 10,946 किमतीच्या अॅक्सेसरीज बदलून मिळतात. (Latest Marathi News)

याशिवाय ग्राहकांच्या लॉयल्टीसाठी 5000 आणि 30000 एक्सचेंज बोनस उपलब्ध आहेत. यासह 8000 ची कॉर्पोरेट सूट आणि 20000 रुपयांची विशेष कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.

Honda City
Top Selling Scooter: Activa नंतर 'ही' आहे देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर

City e:HEV मॉडेलवर 40,000 सूट

Honda City च्या City e:HEV मॉडेलवर 40,000 रुपयांची रोख सवलत दिली जात आहे. जी केवळ V प्रकारापुरती मर्यादित आहे. सिटी e:HEV च्या टॉप-स्पेक ZX प्रकारावर कोणतीही सूट नाही. (Latest Marathi News)

Honda Elevate

Honda Cars India सप्टेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात आपली नवीन Elevate C-Segment SUV च्या किमती जाहीर करेल. Honda Elevate ची Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyrider, Skoda Kushaq, Volkswagen Tigun आणि MG Aster शी स्पर्धा होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com