RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

RBI Sold 35 Tons of Gold? Fact Check : आरबीआयने 35 टन सोनं विकल्याचा दावा व्हायरल झाला होता. मात्र पडताळणीत असं समोर आलं की हा दावा खोटा आहे. आरबीआयकडे सध्या 880 टन सोनं उपलब्ध असून, अर्थव्यवस्था स्थिर आहे.
gold
gold Saam TV Marathi News
Published On

Did RBI sell 35 tons of gold fact check : आरबीआयने 35 टन सोनं विकलंय...डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने हे पाऊल उचलल्याचा दावा केलाय...पण, आरबीआयवर सोनं विकण्याची वेळ आलीय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात... (Truth behind viral video claiming RBI sold gold)

या व्हिडिओत जो दावा केलाय तो धक्कादायक आहे...जास्त खर्च, कर्जाचा डोंगर, की टैरिफचा दबाव...? देशाची तिजोरी रिकामी का झाली? तिजोरीतील 60 हजार कोटी कुठे गेले? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय...आरबीआयने 35 टन सोनं विकल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच असं झालंय का...? अशी वेळ का आली...?

gold
Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

35 टन सोनं का विकलं? याचीही माहिती देण्यात आलीय...आंतरराष्ट्रीय परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने कमकुवत होतोय...रिझर्व्ह बँकेला तिच्या तिजोरीतील ही संपत्ती विकावी लागली. ही घसरण रोखण्यासाठी, रिझर्व्ह बँकेला डॉलरसह सोनेही परकीय चलन बाजारात आणावे लागले. असा दावा केलाय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती आरबीआयकडूनच मिळू शकते...

gold
Rahul Gandhi H-Files : राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब, ब्राझिलच्या मॉडेलचे नाव घेत भाजपवर पुराव्यासह गंभीर आरोप

त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळवली...मात्र, कुठेही अशी माहिती मिळाली नाही...उलट गेल्या एका वर्षभरात आरबीआयनेच 65 टन सोनं विकत घेतल्याची माहिती मिळाली...द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, ही माहिती आहे...तर द इकॉनॉमिक्स टाईम्स, टाईम्स ऑफ इंडियाच्या बातम्यांनुसार, आपली अर्थव्यवस्था मजबूत असून, रिझर्व्ह बँकेकडे 880 टन सोनं उपलब्ध असल्याची माहिती दिलीय...त्यामुळे आम्ही याबाबत अधिक माहिती एक्सपर्टकडूनही घेतली...

gold
Pune crime : पुण्यात अल्पवयीन गँगस्टर्सचा धुमाकूळ, गुन्हेगारी जगतातलं भयान वास्तव, पाहा स्पेशल रिपोर्ट

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

आरबीआयकडे 880 टन सोनं उपलब्ध

भारताची अर्थव्यवस्था मजबूत

35 टन सोनं विक्रीचा कुठेही उल्लेख नाही

फॉरेन पॉलिसी आणि अर्थव्यवस्थेचा संबंध नाही

या दाव्यात तथ्य नाही...35 टन सोनं आरबीआयने विकल्याचा पुरावाही नाही...तशी प्रेसनोटही नाही...आरबीआयकडे सध्या 880 टन सोनं उपलब्ध आहे...त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने कमकुवत होत असल्याने आरबीआयने 35 टन सोनं विकल्याचा दावा आमच्या पडताळणी असत्य ठरलाय.

gold
देव दिवाळीला काळाचा घाला, हावडा एक्सप्रेसने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना उडवले, ८ महिला भाविकांच्या चिंधड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com