

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या (DA) वाढीकडे देशभरातल्या ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाखांपेक्षा जास्त पेन्शनर्सचे लक्ष लागले आहे. सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे नवरात्री किंवा दिवाळीआधी सरकारकडून DA वाढीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलैपासून लागू होणाऱ्या DA ची घोषणा साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये केली जाते. त्यामुळे यंदाही नवरात्रीच्या आसपास किंवा दिवाळीआधी याबद्दल निर्णय होऊ शकतो. विशेष म्हणजे, घोषणा उशिरा झाली तरी वाढीव DA हा १ जुलै २०२६ पासून लागू मानला जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना थकबाकीचा एरियर मिळण्याची शक्यता आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरीच्या ६० टक्के इतका DA मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. AICPI-IW च्या जुलै २०२६ च्या आकडेवारीनुसार निर्देशांक १५३.२ वर पोहोचल्यामुळे DA ६४ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच सध्याच्या दराच्या तुलनेत ४ टक्क्यांची वाढ होऊ शकते.
मात्र DA मध्ये ४ टक्के वाढ झाली म्हणजे एकूण इन-हँड पगारात थेट ४ टक्के वाढ होईल असं नाही. DA ची गणना बेसिक सॅलरीवर केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष पगारवाढ ही संबंधित कर्मचाऱ्याच्या बेसिक पेवर अवलंबून असेल. या वाढीचा फायदा फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारापुरता मर्यादित नसून पेन्शनर्सच्या मासिक पेन्शनवरही होऊ शकतो. त्याचबरोबर पीएफ आणि ग्रॅच्युइटीसारख्या घटकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर सरकारकडून अधिकृत घोषणा होणार असून, सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना वाढीव रक्कम आणि एरियर मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.