
करंट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात येणार असून गुंतवणूकदारांसाठी ही एक महत्त्वाची गुंतवणुकीची संधी ठरू शकते. कंपनीचा आयपीओ २६ ऑगस्ट २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार असून गुंतवणूकदारांना २९ ऑगस्टपर्यंत यात सहभागी होता येणार आहे. या इश्यूसाठी कंपनीने ७६ रुपये ते ८० रुपये प्रति शेअर असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
या सार्वजनिक इश्यूमुळे गुंतवणूकदारांना कंपनीतील हिस्सा खरेदी करून पायाभूत सुविधा क्षेत्रातील भविष्यातील वाढीचा भागीदार होण्याची संधी मिळणार आहे. देशात सध्या बांधकाम आणि विकास प्रकल्पांना गती मिळत असल्याने या आयपीओला बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Investorgain.com च्या माहितीनुसार, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ४० रुपये प्रीमियमवर उपलब्ध आहेत. याचा अर्थ लिस्टिंगच्या वेळी गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स NSE वर लिस्ट होणार असून संभाव्य लिस्टिंग तारीख ३ सप्टेंबर २०२५ अशी असू शकते.
२०१३ मध्ये राजस्थानातून सुरू झालेली करंट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड आता उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालसारख्या विविध राज्यांमध्ये विस्तारली आहे. कंपनीच्या ऑर्डर बुकपैकी ५३ टक्क्यांहून अधिक भाग राजस्थानच्या बाहेरून येतो. ज्यातून वाढत्या भौगोलिक विविधतेचे संकेत मिळतात. कंपनीचे प्रवर्तक सुनील सिंग गंगवार आणि त्यांचे कुटुंब ऑपरेशन्सचे नेतृत्व करत असून, सध्या १०८ व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
गेल्या तीन वर्षांत कंपनीचा निव्वळ नफा सहापट वाढला आहे. यामुळे कंपनीच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेचा आणि स्थिरतेचा अंदाज येतो. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा EBITDA १६ टक्क्यांहून अधिक झाला असून, सातत्याने मार्जिन सुधारले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हा आयपीओ आकर्षक मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.