

सरकार विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतं. आता राणी लक्ष्मी योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थीनींना मोफत स्कूटी मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नेमका कोणत्या विद्यार्थींनीना याचा लाभ घेता येईल आणि राणी लक्ष्मीबाई योजना काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
उत्तर प्रदेशातील विद्यार्थींनीना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सरकार राबवत आहे. सरकारचा मुळ उद्देशही हाच आहे. यामुळे मुलींना कॉलेजमध्ये ये-जा करणं सोयीस्कर होईल. या योजनेचा लाभ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थींनींना मिळणार आहे. हे वाटप कोणत्याही पक्षाअंतर्गत केलं जाणार नाही. तर यामध्ये मुलींना पहिल्या वर्षात मिळालेले गुण तपासले जातील. त्यानुसार योजनेचा लाभ घेता येणार आहे.
दुचाकींचे वाटप हे निष्पक्ष पद्धतीने केलं जाणार आहे. पण मुलींचे गुण यात तपासले जातील. या गुणांची माहिती नमूद करून ठराविक विद्यार्थिनींची निवड होईल. त्यांनाच शासनाकडून मोफत दुचाकी दिली जाईल. आता ९ लाख मुली उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आणि पदवी महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत.
त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही योजना राबवण्यात येणार आहे. उच्च शिक्षण विभागाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत दुचाकी देण्याची तयारी केली आहे.
राणी लक्ष्मीबाई योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून काम सुरु करण्यात आलं आहे. लवकरच वरिष्ठ अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्यासमोर या योजनेचं सादरीकरण केलं जाईल. मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.