इस्राइल-हमास युद्धाचा फटका मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवर दिसून आला आहे. परंतु, आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल झाला आहे का असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. जाणून घेऊया पेट्रोल-डिझेलच नवे दर
1. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
इस्राइल-हमास युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली होती परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात (Market) कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आज WTI कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.52 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे आणि ते प्रति बॅरल $ 83.06 च्या जवळपास व्यवहार करत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.40 टक्क्यांची घट दिसून आली आहे आणि ते प्रति बॅरल $ 85.48 वर आहे.
2. मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?
मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात किचित वाढ झाली आहे.
पुण्यात पेट्रोल १०६.०५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.५६ रुपयांनी विकलं जातंय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किचिंत घट झाली आहे.
ठाण्यात (Thane) पेट्रोलचा आजचा भाव १०६.३८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४. ३४ रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
नागपूरमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.५९ रुपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.