Petrol Diesel Price (4th August): खुशखबर! कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Petrol Diesel Price Today 4th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.
Petrol Diesel Price
Petrol Diesel Price saam Tv
Published On: 

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi): पेट्रोल डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. यामध्ये सातत्याने चढ-उतार होत असतो. मागच्या काही काळापासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसून आली आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली.

परंतु, आज शुक्रवारी WTI क्रूड ऑइल 0.28 टक्क्यांनी वाढले आहे आणि ते प्रति बॅरल $ 81.78 च्या आसपास आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइलच्या (Oil) किंमतीत 0.21 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ती प्रति बॅरल $ 85.32 वर आहे. या वाढीनंतर आज भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे.

Petrol Diesel Price
Gold Silver Rate (3rd August): गोल्डन चान्स! सोन्याचा भाव दणकून आपटला, चांदीच्या भावातही घसरण; जाणून घ्या आजचे दर

1. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?

  • नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price
Belapur Station : जागा एकच पण रेल्वे स्टेशन दोन, नावही त्यांचे वेगळे

2. शहरानुसार किंमत कशी तपासायची-

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज तेल कंपन्या ठरवतात. शहरे आणि राज्यानुसार या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा. तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.