

सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काही बदल होईल का हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
रक्षाबंधनच्या काळात केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये कपात केली होती त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा एलपीजीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे पेट्रोल- डिझेलच्या दरातही कपात करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागच्या वर्षभरापासून पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलात पडझड सुरुच आहे. आज बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $ 84.58 आहे. त्याच वेळी, WTI क्रूडचा दर प्रति बॅरल $ 82.79 आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर किती पाहूया.
1. मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?
मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे. आज डिझेलच्या दरात काही रुपयांनी वाढ झाली आहे.
पुण्यात पेट्रोल १०६.२० रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.७१ रुपयांनी विकलं जातंय.
ठाण्यात (Thane) पेट्रोलचा आजचा भाव १०६.३८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४. ३४ रुपयांनी विकलं जाईल.
नागपूरमध्ये पेट्रोल १०६.११ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.६६ रुपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.