Petrol Diesel Rate (19th Feb 2024) : यूपीमध्ये पेट्रोल-डिझेल महाग, महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 19th February 2024 :आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे.
Petrol Diesel Rate (19th Feb 2024)
Petrol Diesel Rate (19th Feb 2024) Saam Tv

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा ८३ डॉलरच्या आसपास पोहोचल्या आहेत.

रोज सकाळी सरकारी तेल कंपन्या पेट्रोल (Petrol)-डिझेलचे नवीन दर जारी करत असतात. अशातच आज सकाळी यूपीमधील अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. पण दिल्ली आणि मुंबईसारख्या (Mumbai) शहरांमध्ये तेलाच्या दरात (Price) कोणताही बदल झालेला नाही.

जागतिक बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 82.80 पर्यंत वाढली आहे. डब्ल्यूटीआयचा दर देखील आज वाढला आहे आणि प्रति बॅरल $ 78.81 पर्यंत पोहोचला आहे.

Petrol Diesel Rate (19th Feb 2024)
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : ग्रहांची युती! ५ राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा, पैशांची चणचण भासेल

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.५९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९३.०९ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.५१ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.०२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.७५ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com