Budget Friendly Car: टॉप सिक्युरिटी, जबरदस्त फिचर; मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या ५ कार

Budget Friendly Car With Safety Features: आपली स्वतः ची कार असावी असे सर्वांचेच स्वप्न असते. कार घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. कमी बजेटमध्ये चांगले सेफ्टी फिचर्स असलेली कार सर्वांनाच घ्यायची असते.
Budget Friendly Car
Budget Friendly CarSaam Tv

आपली स्वतः ची कार असावी असे सर्वांचेच स्वप्न असते. कार घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. कमी बजेटमध्ये चांगले सेफ्टी फिचर्स असलेली कार सर्वांनाच घ्यायची असते. कार घेताना सर्वात सेफ्टी फीचर्स खूप महत्त्वाचे असतात. तुमच्या बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेल्या कारची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

किआ सोनेट (Kia Sonet)

किआ कंपनीने भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली आहे. कंपनीच्या या एसयूव्हीमध्ये लेव्हल-1 ADAS देण्यात आली आहे. हे फीचर कारच्या GTX+ आणि x-Line प्रकारांमध्ये देण्यात आले आहे. या कारमध्ये १० सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे. या कारची किंमत १४.५५ लाख रुपये आहे.

ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue)

ह्युंदाई वेन्यू कारमध्ये ADAS सोबत अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीच्या या कारमध्ये Level-1 ADAS देण्यात आला आहे. हे फिचर कारच्या sx(o) व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहे. या कारची किंमत १२.४४ लाख रुपये आहे.

Honda Elevate

Honda Elevate कारमध्येदेखील ADAS फीचर ऑफर करण्यात आले आहे. या फीचरला Honda Sensing असेही म्हटले जाते. होंडा एलिवेटच्या zx व्हेरियंटमध्ये हे फीचर देण्यात आले आहे. या कारची किंमत १५.४१ लाख रुपये आहे.

Budget Friendly Car
UPI Payment Trend: डिजिटल पेमेंटमुळे लोकांचा वाढला अधिकचा खर्च, फक्त इतक्या लोकांना झाला फायदा; सर्व्हेतून माहिती उघड

Honda City

होंडा सिटी या सेडान कारमध्येदेखील ADAS सेफ्टी फीचर देण्यात आले आहे. याचसोबत कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर देण्यात आले आहे. हे फिचर कारच्या V, VX, ZX व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहे. ही कार तुम्हाला १२.८५ लाख रुपयांना खरेदी करता येईल.

Mahindra XUV 3X0

महिंद्राने नुकतीच Mahindra XUV 3X0 कार बाजारात लाँच केली आहे. कंपनीच्या या कारमध्ये ADAS फीचर देण्यात आले आहे. कंपनी या कारमध्ये लेव्हल 1-ADAS सुविधा प्रदान करते. या कारची किंमत १३.४९ लाख रुपये आहे.

Budget Friendly Car
Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com