ChatGpt Down : चॅटजीपीटी बंद! जगभरात कामकाज ठप्प, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

ChatGpt News : जगभरातील चॅटजीपीटी वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. कारण लोकप्रिय एआय चॅटबॉट चॅटजीपीटी अचानक डाऊन झाले आहे. भारतातील ४३९ हून अधिक वापरकर्त्यांनी समस्यांची नोंद केली आहे. मात्र ओपनएआयची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
ChatGpt Down : चॅटजीपीटी बंद! जगभरात कामकाज ठप्प, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस
ChatGpt newsSaam Tv
Published On
Summary
  • चॅटजीपीटी अचानक डाऊन झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांमध्ये अस्वस्थता

  • भारतातील ४३९ पेक्षा अधिक वापरकर्त्यांनी समस्यांची नोंद केली

  • सोशल मीडियावर तक्रारी आणि चर्चांचा पाऊस

  • ओपनएआयची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही

चॅटजीपीटी वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार चॅटजीपीटी थकलं आहे. म्हणजेच काही काळापासून बंद पडलं आहे. जगभरातील अनेक चॅटजीपीटी वापरकर्त्यांनी चॅटजीपीटी बंद पडल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या बद्दल अनेकांनी तक्रारी व्यक्त केल्या आहेत.

डाउनडिटेक्टरच्या म्हणण्यानुसार, शेकडो वापरकर्त्यांनी अडचणींचा अनुभव घेतला आहे. भारतातील ४३९ हून अधिक वापरकर्त्यांनी समस्यांची याबाबत नोंद केली आहे. मात्र ओपनएआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

ChatGpt Down : चॅटजीपीटी बंद! जगभरात कामकाज ठप्प, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस
DeepSeek: Chat-GPT चं टेन्शन वाढवणारं चीनचं DeepSeek काय आहे? DeepSeek कसा कराल डाउनलोड?

विविध ऑनलाइन सेवा स्थितीचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते मागील २० ते ३० मिनिटांत शेकडो वापरकर्त्यांनी एआय चॅटबॉटमधील येत असलेल्या अडचणींचा अहवाल समोर आला आहे. या आउटेजमुळे जगभरातील मोठ्या संख्येने वापरकर्त्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे, जिथे ४३९ हून अधिक वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टरवर समस्या नोंदवल्या आहेत. मात्र याबाबत चॅटजीपीटीच्या डेव्हलपर ओपनएआयने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

ChatGpt Down : चॅटजीपीटी बंद! जगभरात कामकाज ठप्प, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस
ChatGPT वरून माहिती घेतली, १६ वर्षाच्या मुलाने आयुष्य संपवलं, पालकांची कोर्टात धाव

सोशल मीडियावर यामुळे मोठी चर्चा सुरू आहे. काहींनी चॅटजीपीटी काम करत नसल्यामुळे कामकाजात अडथळा येत असल्याचे सांगितले आहे. विशेषतः आयटी क्षेत्र, कंटेंट क्रिएटर्स, तसेच शैक्षणिक क्षेत्रात चॅटजीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे अचानक झालेल्या या डाऊनमुळे वापरकर्त्यांचे दैनंदिन काम थांबले असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.

ChatGpt Down : चॅटजीपीटी बंद! जगभरात कामकाज ठप्प, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस
What not to ask ChatGPT: चुकूनही ChatGPT ला विचारू नका या गोष्टी; फायदा सोडून नुकसान होईल

दरम्यान, वापरकर्त्यांनी ही समस्या किती वेळ कायम राहील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चॅटजीपीटीसारख्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या एआय सेवेमध्ये खंड पडल्याने वापरकर्त्यांमध्ये अस्वस्थता अधिक वाढली आहे. जगभरातील वापरकर्त्यांचे लक्ष आता ओपनएआयच्या अधिकृत प्रतिक्रियेवर केंद्रित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com