Surabhi Jayashree Jagdish
आजकाल आपण काहीही प्रश्न पडले की ते ChatGPT ला विचारतो.
मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही चॅट जीपीटीला विचारू नये.
ChatGPT गुंतवणुकीसाठी तज्ज्ञ नाही. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, किंवा क्रिप्टोकरन्सी ही क्षेत्रं सतत बदलतात आणि जोखमीने भरलेली असतात. चुकीच्या सल्ल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं.
ChatGPT डॉक्टर नाही. AI काही लक्षणांवर आधारित साधी माहिती देऊ शकतो. चुकीची माहिती घेतल्यास तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
कायदा प्रदेशानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतो. ChatGPT कायद्यानुसार अचूक सल्ला देऊ शकत नाही. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात.
हॅकिंग कसं करायचं?, बॉम्ब कसा बनवायचा?, फेक प्रमाणपत्र कसं तयार करायचं? असं विचारू नका. हे पूर्णपणे कायद्याविरुद्ध आहे.
ही संवेदनशील व गंभीर बाब आहे. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञ किंवा हेल्पलाइनची मदत घ्या.