Surabhi Jayashree Jagdish
'पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' हा वाक्यप्रयोग तु्म्ही ऐकला असेल. मात्र असं का म्हटलं जातं याची तुम्हाला कल्पना आहे का?
'पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' हा वाक्यप्रयोग मराठा साम्राज्याच्या पेशवाई कालखंडातील सत्ता आणि कारभाराची स्थिती स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो.
या म्हणीचा अर्थ असा नाही की, पेशवे फक्त खाण्यापिण्यातच मग्न होते, तर त्यांचा भर ऐषाराम, मोठ्या पंगती आणि प्रशासनापेक्षा वैयक्तिक सुखसोयींवर जास्त होता. ज्यामुळे साम्राज्याची ताकद कमी झाली.
उत्तर पेशवाईत, विशेषतः दुसऱ्या बाजीरावाच्या काळात, पुण्यात पेशव्यांच्या दरबारात मोठे सण-समारंभ आणि भोजनावळी (पंगती) मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात असत. यावर अमाप पैसा खर्च केला जात असे.
थोरले बाजीराव, माधवराव पेशवे यांसारख्या पराक्रमी पेशव्यांच्या मृत्यूनंतर, नंतरच्या पेशव्यांच्या काळात राजकीय अस्थिरता वाढली. अंतर्गत राजकारण, कटकारस्थाने आणि वारसा हक्कासाठीचे वाद विकोपाला गेले.
ऐषाराम आणि अंतर्गत कलहांमुळे प्रशासनाकडे दुर्लक्ष झालं. महसूल व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आणि जनतेच्या समस्यांकडे कमी लक्ष दिलं गेलं आणि राज्याचा पाया कमकुवत झाला.
राज्याचा विस्तार होत असतानाही, आर्थिक व्यवस्थेचं योग्य नियोजन झालं नाही. केवळ लुटीवर आधारित उत्पन्न मर्यादित राहिलं आणि नियमित महसूल यंत्रणा कमकुवत झाली.