FACT CHECK: केंद्र सरकारची महिलांसाठी वर्क फ्रॉम योजना, महिन्याला मिळणार 25000 रुपये, नेमकं सत्य काय?

कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकार नवी 'वर्क फ्रॉम होम' योजना आणत असून, यामुळे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत महिलांना घरी बसूनच पैसे कमवता येणार आहेत.
Truth about PIB fact check work from home job scheme for women
Truth about PIB fact check work from home job scheme for women saam tv
Published On: 

महिलांना घराची जबाबदारी सांभाळण्यासोबतच कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा लागतो. वाढत्या महागाईच्या काळात घर सांभाळण्यासाठी किंवा पतीला घरखर्चात मदत म्हणून काम करण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. मात्र, घरगुती जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिलांना बाहेर जाऊन काम करणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार महिलांसाठी एक नवी 'वर्क फ्रॉम होम' योजना राबवत आहे. यामुळे महिलांना आता घरी बसूनच पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यानुसार केंद्र सरकार 'महिला वर्क फ्रॉम होम योजना' राबवत असून त्या अंतर्गत महिलांना घरबसल्या काम करून दरमहा २५,००० रुपये वेतन दिले जाणार आहे. यूट्यूबवरील 'Buddhsen92TechOfficial' नावाच्या चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे.

या व्हायरल व्हिडिओची इंडिया टीव्हीच्या फॅक्ट चेक टीमने सत्यता तपासण्यासाठी त्याची पडताळणी केली. पडताळणीत असे स्पष्ट झाले की, केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही आणि यासंदर्भात कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. सबंधित यूट्यूब चॅनेलने व्ह्यूज आणि लाइक्स मिळवण्यासाठी स्वतःच्या कल्पनेतून ही खोटी अफवा पसरवण्यात आली आहे.

Truth about PIB fact check work from home job scheme for women
PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीआधीच खात्यात ₹२,००० जमा होणार, सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर

शासकीय योजनांची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहावे. पीआयबी फॅक्ट चेकने देखील नागरिकांना कृपया अशा मोहक दाव्यांना बळी पडू नका. केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा असे आवाहन केले आहे.

Truth about PIB fact check work from home job scheme for women
ड्रायव्हिंग लायसन्सचा नियम बदलला! पास होण्यासाठी ६० नव्हे तर ७५% गुण पाडावेच लागणार, केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

महिलांना सतर्क राहण्याचे आदेश

सोशल मीडियावर कोणतीही माहिती किंवा योजना पाहिल्यानंतर तिची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापूर्वी किंवा वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी सतर्क राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com