DA Hike: ​केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीचा मुहूर्त ठरला, 3 महिन्याची थकबाकीही मिळणार

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
 DA Hike
DA HikeSaam Tv
Published On

केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत वाढ केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत ३ टक्क्याने वाढ करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो तर महागाई सवलत ही पेन्शनधारकांना दिली जाते.सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता ३ टक्के वाढ होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण महागाई भत्त हा ५३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. (DA Hike)

 DA Hike
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

७ मार्च २०२४ रोजी शेवटचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू झाली होती. त्यावेळी एकूण ५० टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यातील वाढ दरवर्षी जानेवारीपासून लागू केली जाते.

महागाई भत्त्यातील वाढ ही अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI)च्या आधारे निश्चित केली जाते. विविध क्षेत्रातील किरकोळ बाजारातील किंमतीमधील बदलांचे परिक्षण करुन ही वाढ निश्चितकेली जाते.सप्टेंबर २०२० पासून, सरकारने २०१६ च्या नवीन ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे महागाई भत्त्यात वाढ केली आहे.

 DA Hike
PPF Scheme: 'ही' सरकारी योजना बनवेल तुम्हाला करोडपती, 12,500 रुपये गुंतवल्यानंतर मिळणार एवढी मोठी रक्कम; वाचा...

महागाई भत्ता वाढीचा परिणाम

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भत्त्यांमध्ये वाढ होईल त्यामध्ये वाहतूक भत्ता, दिव्यांग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता, मुलांचे शिक्षण भत्ता, घरभाडे भत्ता आणि एचआरएचा समावेश होतो. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

 DA Hike
Government Scheme For Farmers : खुशखबर! शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात मिळणार तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंचे कर्ज; काय आहे केंद्र सरकारची नवी योजना? जाणून घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com