PM Kisan Yojana Rules : PM किसान योजनेचे पैसे पती-पत्नी दोघांनाही मिळू शकतात? वाचा नियम

PM Kisan Yojana Benefits : किसान सम्मान निधि योजनेमार्फत कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही शेतकरी असल्यास त्यांना दोघांना देखील वेगवेगळे पैसे मिळतात का?
PM Kisan Yojana Benefits
PM Kisan Yojana Rules Saam TV
Published On

भारत सरकारमार्फत आजवर अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक योजना गरजू व्यक्तींसाठी असतात. यामध्ये आरोग्यापासून ते शेती अशा विविध गोष्टींसाठी योजना सुरू आहेत. देशातील कोटींच्या संख्येतील जनता या योजनांचा लाभ घेते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांची संख्या फार जास्त आहे. शेतकरी म्हणजेच आपल्या देशाचा पोशींदा असं देखील म्हटलं जातं.

PM Kisan Yojana Benefits
Ayushman Arogya Yojana: फक्त ८५० रुपये भरा अन् ३५ लाखांपर्यंत उपचार मिळवा; आयुष्मान आरोग्य योजना नक्की आहे तरी काय?

मात्र शेती व्यवसायात बऱ्याचदा नुकसान होते. वरून राजा प्रसन्न असल्यास त्या वर्षी पीक चांगलं येतं. मात्र अवकाळी पाऊस आल्यास हातातोंडाशी आलेलं पीक भूईसपाट होतं. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना २०१८ पासून लागू झाली. तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

दरवर्षी ६ हजार रुपये खात्यात जमा

किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी ६ हजार रुपये जमा होतात. दर ४ महिन्यांच्या अंतरावर यातील २ हजार रुपये टप्प्या टप्प्याने खात्यात जमा होतात. शेतकऱ्यांना याचा फार फायदा होतो. शेतीच्या विविध कामांसाठी आर्थिक मदत मिळते.

पती-पत्नी दोघांना पैसे मिळणार का?

अशात किसान सम्मान निधि योजनेमार्फत कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही शेतकरी असल्यास त्यांना दोघांना देखील वेगवेगळे पैसे मिळतात का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

किसान सम्मान निधि योजना प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी आहे. या योजनेत एका कुटुंबाला ६ हजार रुपये असे पैशांचे वितरण होते. म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला याचे पैसे मिळतात. त्यामुळे एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांना देखील या योजनेचा लाभ मिळणे शक्य नाही. दोघांपैकी एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येतो.

एकाच कुटुंबातील २ भावांना लाभ मिळणार का?

एकाच कुटुंबातील दोन भाऊ सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर दोन्ही भाऊ वेगवेगळ्या घरात राहत असतील आणि त्यांची शेती सुद्धा वेगवेगळी असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

PM Kisan Yojana Benefits
Wife and Husband Case : घटस्फोट हवाय? महिन्याला ६ लाखांची पोटगी द्या; महिलेच्या मागणीने न्यायाधीश भडकले, कोर्टात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com