Wife and Husband Case : घटस्फोट हवाय? महिन्याला ६ लाखांची पोटगी द्या; महिलेच्या मागणीने न्यायाधीश भडकले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Wife and Husband Familly matter : एका महिलेने तिच्या पतीकडे ६ लाखांची पोटगी मागितली आहे. महिलेने महिन्याला तब्बल ६ लाखांची पोटगी मागणी केल्यानंतर महिला न्यायाधीश भडकल्या. कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा
High Court on husband wife case
High Court on husband wife case SAAM TV
Published On

नवी दिल्ली : पतीपासून वेगळे राहणाऱ्या महिलेने पोटगी म्हणून नवऱ्याकडे महिन्याला ६ लाख १६ हजारांची मागणी केली. महिलेने हायकोर्टात वकिलांतर्फे कोर्टात मागणी केली. महिलेची मागणी पाहताच महिला न्यायाधीश भडकल्या. महिलेच्या मागणीने न्यायाधीश भडकल्याचे दिसून आले. महिलेला खर्च करण्याची हौस असेल तर त्यांनी स्वत: कमाई करावी, अशा शब्दात महिला न्यायाधीशांनी महिलेला झापलं. या सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिलेच्या वकिलांनी महिन्याच्या संपूर्ण खर्चाची यादी कोर्टात मांडली. तसेच पती चांगली कमाई करत असल्याचा दावा महिलेने मागणी करताना केला. कर्नाटक हायकोर्टातील हे प्रकरण आहे. महिलेच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, 'महिलेला प्रत्येक महिन्याला १५ हजार रुपयांचे सँडल आणि कपडे लागतात. महिन्याला ६० हजार रुपये जेवणासाठी हवेत. गुडघ्याचा त्रास असल्याने उपचारासाठी महिन्याला ४-५ लाख रुपये हवेत. तसेच बाहेरचं जेवण, औषधे आणि अन्य वस्तूंचाही त्यात समावेश आहे. असा एकूण ६ लाख १६ हजारांचा बजेट महिलेच्या वकिलांनी सांगितला'.

High Court on husband wife case
Supreme Court: देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च पाऊल! नॅशनल टास्क फोर्सची स्थापना; समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश? वाचा..

महिलेच्या पतीकडे केलेल्या मागणीवरून महिला न्यायाधीश भडकल्या. कोर्टाच्या वेळेचा दुरुपयोग केल्याचं म्हणत न्यायाधीशांनी सुनावलं. महिला न्यायाधीश पुढे म्हणाल्या, महिलेने स्पष्ट करावं की, माणसाच्या गरजा काय-काय आहेत? एका व्यक्तीला महिन्याला किती खर्च लागतो? महिलेला इतका खर्च करायचा असेल तर तिने स्वत: कमाई करावी. पतीकडून घ्यायची काय गरज आहे? महिलेला मुलाबाळांची जबाबदारी नाही, अशाही महिला न्यायाधीश म्हणाल्या.

High Court on husband wife case
Supreme Court Recruitment: सर्वोच्च न्यायालयात १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;मिळणार ६०,००० रुपये पगार; असा करा अर्ज

महिला न्यायाधीश यांनी या महिलेची याचिका फेटाळली. योग्य मागणी करून पुन्हा याचिका दाखल करण्याचीसाठी महिला न्यायाधीशांनी सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी २० ऑगस्ट रोजी झाली होती.

दरम्यान, ३० सप्टेंबर बेंगळुरुमधील कौटुंबिक कोर्टाने महिलेला ५० हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केली होती. यानंतर ही महिलेने हायकोर्टात धाव घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com