Business Idea
Business IdeaSaam Tv

Business Idea: सणासुदीच्या काळात व्हाल लखपती! 2 महिने करा हा बिझनेस, कमवाल अधिक पैसे

How To Earn Money : देशात असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवू शकतात.
Published on

Festival Season Business :

राज्यात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी असे एकामागोमाग सण आहेत. त्यामुळे अनेक व्यवसाय सुरू करण्याची ही योग्य संधी आहे. देशात असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवू शकतात.

कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी मागणी आणि योग्य बाजारपेठ माहित असणे महत्त्वाचे आहे. सणासुदीत अनेक वस्तूंना मागणी असते. त्यामुळे या काळात तुम्ही अनेक व्यवसाय सुरु करु शकतात.

नवरात्र (Navratri), दिवाळी, दसरा या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे अनेक व्यवसायांना प्राधान्य मिळते. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात व्यवसाय (Business) करुन अतिरिक्त पैसे कमवू शकता.

1. सजावटीचे सामान

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सणासुदीत सजावट केली जाते. त्यामुळे सजावटीच्या सामानाची मागणी वाढते. त्यामुळेच अनेक सजावटीच्या प्लास्टिकच्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जातात. या वस्तू बाजारातून (Market) खरेदी करुन रिटेलमध्ये विकू शकता. कोणत्याही बाजारात, सोसायटीत तुम्ही या वस्तू सहजपणे विकू शकता.

Business Idea
Budget Friendly Hotel In Nashik: नाशिकमध्ये कपल्ससाठी बजेट फ्रेंडली हॉटेल्स; कमी खर्चात बेस्ट पर्याय

2. मातीचे दिवे

नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत अनेक सण असतात. या सणांना दिव्यांचा सण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या काळात दिवे लावून पूजा करतात. या काळात मातीच्या दिव्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे तुम्ही मातीचे दिवे बनवून किंवा विकत घेऊन हा व्यवसाय करु शकता. विशेष म्हणजे, मातीचे दिवे तुम्ही घरबसल्या बनवू शकता.

3. पूजा साहित्य

सणासुदीच्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा. या काळात तुम्ही पूजेच्या साहित्यांचा व्यवसाय केला तर नक्कीच नफा होईल. यात तुम्ही अगरबत्ती, कापूर, चंदन अशा अनेक गोष्टी विकू शकता. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे.

Business Idea
Gold Silver Price Today (7th October): खरेदीदारांना झटका! सोन्याच्या भावात वाढ, चांदीही चकाकाली; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

4. इलेक्ट्रॉनिक दिवे

नवरात्री, दसरा, दिवाळी या काळात आपण घर सजवतो. प्रत्येक वेळी दिवे लावणे शक्य होत नाही म्हणून इलेक्ट्रॉनिक दिव्यांनी सजावट करतात. त्यामुळे या दिव्यांचा व्यवसाय करणे खूप फायद्याचे आहे.

5. मूर्ती

दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तींची मागणी असते. त्याकाळात हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरेल. याचसोबत कृत्रिम फुलांचे हार, सजावटीचे हार या वस्तूही मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com