आजकाल अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत मोबाईल रिचार्ज देखील आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे. इंटरनेट रिचार्ज शिवाय कोणतही काम करणे अशक्य आहे. मात्र सध्या रिचार्ज प्लान खूप महाग होत जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशात आता बीएसएनएल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. बीएसएनएल कंपनीने स्वस्त रिचार्ज प्लान तयार केले आहेत.
BSNL ने आपल्या तीन सुरुवातीच्या ब्रॉडबँड प्लानच्या किंमती कमी केल्या आहेत. तसेच या प्लानच्या फिसर्चमध्ये काही बदल देखील केले आहेत. आता हे तिन्ही प्लान पूर्वीपेक्षा जास्त इंटरनेट स्पीडने चालणार आहेत. याचा स्पीड 25Mbps पर्यंत कंपनीने वाढवला आहे. या तिन्ही प्लानच्या किंमती 249 रुपये, 299 रुपये आणि 329 रुपये प्रति महिना आहे. ४०० रूपयांच्या आत तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध असलेला रिचार्ज मिळणार आहे. BSNL चा 249 रुपये आणि 299 रुपयांचे प्लान फक्त नवीन यूजर्ससाठी ठेवण्यात आला आहे. तर 329 रुपयांचा प्लान सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच या प्लानमध्ये उत्तम कॉलिंग सुविधा दिली आहे.
249 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना एक महिना 10GB इंटरनेट डेटा दिला आहे.
299 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये FUP मर्यादा 20GB आहे.
329 रुपयांच्या प्लॅनची FUP मर्यादा 1000GB आहे. तसेच डेटा संपल्यानंतर 4Mbps च्या वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.