BSNL 4G Network: BSNL चे इंटरनेट होणार सुसाट; युजर्संना मिळणार 4G सेवा; कधीपासून?

BSNL 4G Network Launched In India: BSNL कंपनीने आपले 4G नेटवर्क लाँच केले आहे. यासाठी जवळपास १५००० हून जास्त मोबाईल टॉवर्स इन्स्टॉल करण्यात आले आहे.
BSNL 4G Network
BSNL 4G NetworkSaam Tv
Published On

BSNL ने आपली नवीन 4G सेवा लाँच केली आहे. कंपनीने आपले नेटवर्क अपग्रेड केले जात आहे. कंपनीने आपले नेटवर्क अजून सुपरफास्ट करण्यासाठी संपूर्ण देशात 4G नेटवर्क सेवा लाँच केली आहे. कंपनी लवकरच 5G सेवादेखील लाँच करणार आहे. यासाठी त्यांनी नेटवर्क टेस्टिंग सुरु केले. त्यामुळे आता बीएसएनएल कंपनी 5G सिम ग्राहकांना देणार आहे.

BSNL 4G Network
Airtel Recharge : एअरटेल ग्राहकांसाठी खुशखबर! स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळणार 2GB इंटरनेट

BSNL ने १५ हजारांपेक्षाही जास्त साइटसवर 4G नेटवर्क सेवा सुरु केली आहे.कंपनीच्या या साइट्स आत्म निर्भर भारत उपक्रमाअंतर्ग येतात. यामुळे देशातील 4G नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतील. BSNL ची 4G सेवा ही पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाव अवलंबून आहे. मोबाईल टॉवर्समध्ये 4G सेवा इनस्टॉल करण्यात आली आहे.

ऑक्टोबर अखेरपर्यंत ८०,००० हजारांहन अधिक 4G नेटवर्क टॉवर्स इन्स्टॉल करण्यात येतील. त्यानंतर पुढील वर्षी मार्च महिन्यात २१,००० टॉवर्स बसवण्यात येतील. म्हणजेच जवळपास १ लाख 4G नेटवर्क टॉवर्स मार्च २०२५ पर्यंत इन्स्टॉल करण्यात येणार आहे. त्यामुळे युजर्संना मोठा फायदा होणार आहे.

BSNL 4G Network
BSNL पोस्टपेड प्लॅन Jio, Airtel आणि Vi पेक्षा आहे स्वस्त, जाणून घ्या किंमत

4G नेटवर्कनंतर आता बीएसएनएल 5G नेटवर्कदेखील लवकरच लाँच करणार आहे. सध्या 5G नेटवर्कसाठी टेस्टिंग सुरु आहे. टेलिकॉम कंपनीने 5G नेटवर्कचे सिम बनवण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच हे सिम ग्राहकांना देण्यात येतील.

BSNL 4G Network
PM Matru Vandana Scheme: गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना! मिळणार ६ हजार रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com